“अमरेंद्रा बाहुबली” असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो साऊथ चा सुपरस्टार प्रभास. प्रभास हा मुख्यत्वे करुन तेलुगू चित्रपटात काम करतो. “उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू” असे प्रभासचे संपूर्ण नाव आहे. प्रभास हा भारतीय चित्रपसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. २०१५ मध्ये आलेला त्याचा Bahubali-the beginning हा बॉक्स ऑफिसवर खूप चालला. या चित्रपटाने ६५० कोटी इतकी कमाई केली आणि २०१७ मध्ये याचाच २रा भाग म्हणजे Bahubali-the conclusion याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹१८१० कोटी इतकी कमाई करून भारतीय चितरपटसृष्टीतील पहिला असा चित्रपट बनला ज्याने १००० कोटी च्या वर कमाई केली.
असाच एका पौराणिक चित्रपटात प्रभास आपल्याल पुन्हा एकदा दिसणार आहे. “आदिपुरूष” असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट हिंदू महाकाव्य रामायण यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ओम राऊत. टी-सीरीज फिल्म्सआणि रेट्रोफिल्स (Retrophiles) यांद्वारे चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. रामायण म्हटले म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण हे सगळेच आले. तसेच हे सगळे पात्र आपल्याल या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात प्रभास हा राम म्हणजेच आदिपुरुष हे पात्र साकारणार आहे. सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन. लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग दिसणार आहे. १० तोंड असलेल्या रावणाची भूमिका सैफ अली खान हा करणार आहे. तर हनुमानाच्या भूमिकेत आपल्याल दिसणार आहेत आपला मराठी कलाकार जय मल्हार फेम देवदत्त नागे.
आदीपुरूष हा चित्रपट रिलीज होणार आहे ११ ऑगस्ट २०२२ ला. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत देखील पाहता येणार आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० करोड इतके आहे.
प्रभास च्या बाहुबली १ आणि २ या चित्रपटांप्रमाने आदीपुरुष देखील बॉक्स ऑफिस वर भरघोस कमाई करेल अशी अपेक्षा.