आपल्याला रविवारची सुट्टी का मिळते ?

आपल्याल रविवारची सुट्टी का मिळते ?
नारायण मेघाजी लोखंडे

सोमवार, मंगळवार, बुधवार असे करत करत मग येतो रविवार…! रविवार म्हटले की किती रिलॅक्स वाटते. ना काम, ना ऑफिस, ना शाळा… सगळ्याच गोष्टींना सुट्टी असते. पण ही रविवारची सुट्टी आपल्याला दिली कोणी ? ऑफिस वाल्यांनी ? सरकार ने ? तर नाही आपल्याला ही सुट्टी मिळाली नाही तर मिळवून दिली आहे. हो ! तर ही सुट्टी आपल्याला मिळवून दिली आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी.

रविवारची सुट्टी कशी मिळाली ?

पूर्वी ब्रिटिशांच्या काळात हफ्त्याचे सातही दिवस काम करावे लागायचे. एवढे १४ १५ तास काम करूनही कामगारांना एकही दिवस सुट्टी मिळायची नाही. गिरणी कारखान्यात ब्रिटिश कामगारही असायचे त्यांना मात्र रविवारची सुट्टी मिळायची कारण रविवारच्या दिवशी ब्रिटिश लोक चर्च मध्ये जायचे म्हणून त्यांना त्या दिवशी सुट्टी मिळायची. ही गोष्ट लोखंडे यांना आवडली नाही. १८८४ मध्ये पहिल्यांदा ‘बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन’ या नावाने कामगार संघटना स्थापन झाली आणि त्यानंतर नारायण लोखंडे हे या संघटनेचे अध्यक्ष झाले.

या कामगार संघटने अंतरगत लोखंडे यांनी पहिल्यांदा कारखाना कायदा (Factory Act) जो १८८१ मध्ये मंजूर झाला होता त्यात बदल करण्याची ब्रिटिशांकडे मागणी केली, जी ब्रिटिश सरकारने फेटाळून लावली. मग त्याच वर्षी म्हणजे १८८४ लाच लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार सभा आयोजित केली. या सभेमध्ये त्यांनी रविवारच्या सुट्टी बरोबरच जेवणासाठी सुट्टी, निश्चित कामाचे तास, निवृत्ती वेतन अपघाती भरपाई असे अनेक विषय मांडले. त्यातील निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावांना ब्रिटिशांकडून मंजुरी मिळाली. पण तरीही अजून सुट्टीचे मंजूर झाले नव्हते. तरीही नारायण लोखंडे यांनी हार न मानता आपली सुट्टीसाठी ची चळवळ किंवा सभा घेणे चालूच ठेवले. नंतर त्यांच्या या कामगार सभेला इतर राज्यातून देखील कामगार येऊ लागले.

यामध्ये सर्वात महत्वाची सभा ठरली ती म्हणजे १८९० मध्ये मुंबईतील रेसकोर्स मैदानावर आयोजित केलेली सभा. या सभेमध्ये मुंबईतील आणि इतर जिल्ह्यातील असे जवळ जवळ १०,००० कामगार जमा झाले होते याचा परिणाम इतर कामगारांवर देखील होताना दिसला त्यांनी कारखान्यात काम करण्यास मनाई केली. त्यामुळे मुंबईसह सुरत, अहमदाबाद, सोलापूर, नागपूर येथील अनेक कारखान्यांना टाळे लागले. त्यामुळे ब्रिटिश सरकारला कामगारांच्या मागण्या मान्य करणे भाग पडले. आणि १० जुन १८९० साली भारताला पहिली रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली. त्याचबरोबर जेवणाची वेळ आणि निश्चित कामाचे तास याही मागण्या पूर्ण झाल्या.

कोण होते नारायण मेघाजी लोखंडे ?

• नारायण मेघाजी लोखंडे हे मूळचे पुण्याचे. पुणे जिल्ह्यातील खेड जवळील कन्हेरसर गावात १३ ऑगस्ट १८४८ साली जन्म झाला. लोखंडे हे महात्मा फुले यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. लोखंडे हे भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक होते. त्याचबरोबर कामगारांच्या हितासाठी देखील ते ब्रिटिश सरकारशी लढले.

• लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारकडून त्यांना ‘ जे. पी. ‘ (justice of peace) हा किताब देऊन गौरव करण्यात आला.

• त्याचबरोबर लॉर्ड लॅन्सडाऊनच्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांना इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.

• इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.

• मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ पसरली होती. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. पण याही वेळी हार न मानता पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले. परंतु ९ फेब्रुवारी १८९७ ला दुर्देवाने लोखंडे यांचा प्लेगने मृत्यू झाला.

२००५ मध्ये भारत सरकारने त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले.

नारायण मेघाजी लोखंडे टपाल तिकीट
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावे टपाल तिकीट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *