‘बदाम बदाम कच्चा बदाम‘ आले का डोळ्यासमोर गाणे आणि त्या गाण्याच्या स्टेप्स. अहो येणारच… सध्या ‘ कच्चा बदाम ‘ ह्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि अश्या अनेक सोशल मीडिया वर सध्या याच गाण्याची जादू चालू आहे. ह्या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावले आहे. केवळ तरुण पिढीच नाही तर लहान मुले आणि आजोबा आजींनी देखील या गाण्यावर ताल धरला आहे.
तर ‘कच्चा बदाम‘ हे गाणे नक्की आहे तरी कोणाचे ?
ह्या गाण्याचा गायक हा कोणी सुप्रसिद्ध किंवा प्रोफेशनल गायक नसून एक साधा शेंगदाणे विकणार आहे. हो हो! या शेंगदाणा विक्रेत्याचे नाव आहे भुबन बद्यकर. भुबन बद्यकर हा पश्चिम बंगामधील एक साधारण शेंगदाणे विक्रेता आहे. शेंगदाणे विकत असताना त्याने आपल्या अंदाजाने ‘कच्चा बदाम‘ हे गाणे गातो जेणे करून लोक त्याच्याकडे बघतील आणि शेंगदाणे विकत घेतील. असेच गाणे गात असताना एका व्यक्तीला त्याचे हे गाणे इतके आवडले की त्याने ते भूबन ला परत गायला सांगितले आणि त्याचा व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडिया वर टाकला. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि लोकांना तो खूप आवडला. खूप कमी वेळात या व्हिडिओ ला खूप लोकांची पसंती मिळाली. मग गायक आणि संगीतकार नझमू रीचत यांनी या गाण्याचे एक मजेदार रिमिक्स बनवले.
या गाण्यावर मग कच्चा बदाम डान्स चॅलेंज सुरू झाले. आणि ते लोकांना खूप आवडले आणि लोकांनाही ते आवर्जून करावे असे वाटले. हे गाणे केवळ भारतातच प्रसिध्द झाले नाही तर जागतिक स्तरावरही या गाण्याला लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे.
भूबन बद्यकर हा कच्चा बदाम चे गाणे गाऊन शेंगदाणे विकतो ज्याचे त्याला काही पैसे मिळतात पण याच कच्चा बदाम ने भूबन ला चमकवले आहे, प्रसिद्ध केले आहे.. या गाण्या बरोबरच भुबनलाही लोकांनी पसंत केले आहे. या गाण्याचे हरियाणवी भाषेत देखील व्हर्जन निघाले आहे. आणि या गाण्यात आपल्याला दिसणार आहेत रॅपर-गायक अमित धुल, नीशा भट्ट आणि यांच्या सोबतच दिसणार आहे भूबन बद्यकर.