हल्ली फेसबुक, टिक टॉक, इंस्टाग्राम चा जमाना आहे. जो या जमान्याच्या बरोबर चालतो तो पुढे जातो, जो जात नाही तो थोडा मागे पडतो. पूर्वी सोशल मीडिया हे माहितीचे साधन होते पण काळानुरूप हेच माहितीचे साधन आता उत्पन्नाचे देखील साधन झाले आहे. टिक टॉक, इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवून लोक रातोरात प्रसिद्धीस येतात. मग जसजसे लोकांना ते आवडतात तसतसे त्यांचे फॉलॉवर्स वाढत जातात.
पण तुम्हाला माहितीये का कोण आहे सर्वात जास्त फॉलॉवर्स असलेला टिक टॉकर ?
खॅबी लेम ( Khabby Lame ) नाव वाचल्यावर आठवलेच असेल टिकटॉक व्हिडिओ वाला. खॅबी हा टिक टॉक आणि इंस्टाग्रम वर व्हिडिओ बनवतो. तो टिकटॉक वर क्लिष्ट आणि कठीण, कधी कधी समजण्या पलीकडच्या लाईफ हॅक व्हिडिओंची तो शांतपणे थट्टा करतो आणि त्याच्या स्टाइल मध्ये ‘हे असेही करू शकता‘ असे सांगतो. ती त्याची स्टाईल हातवारे करण्याची पद्धत आपणही ट्राय केलीच असणार.
तर नक्की आहे कोण हा खॅबी लेम?
खॅबी चे खरे नाव खबाने लेम (Khabane Lame) आहे. त्याचा जन्म ९ मार्च २००० ला इटलीतील चिवासो येथील सेनेगालिमध्ये झाला. तो फक्त २२ वर्षांचा आहे. आणि त्याचे टिकटॉक फॉलॉवर्स जवळ जवळ १३४ दशलक्ष (134 Million) च्या आसपास आहेत. कोविड-१९ च्या महामारीच्या काळात खॅबी ने टिकटॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे व्हिडिओ हे इटालियन मध्ये चित्रित केलेले असायचे. अत्यंत क्लिष्ट अशा “लाइफ हॅक” दर्शविणार्या व्हिडिओंना टिकटोकच्या “डुएट” आणि “स्टिच” वैशिष्ट्यांच्या रूपात काहीही न बोलता समान कार्य सोप्या पद्धतीने करायचा विडिओं तो प्रतिसाद म्हणून द्यायचा. हा प्रतिसाद (Reply) लोकांना खूप आवडायचा आणि त्याची लोकप्रियता वाढत गेली.
अत्यंत कमी वेळात खॅबी लेम हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा टिकटॉक इन्फ्ल्युएन्सर म्हणजे प्रभावक बनला. कोविड-१९ च्या महामारीच्या काळात खॅबी ला त्याची नोकरी गमवावी लागली परंतु तो हताश न होता प्रयत्न करत राहिला आणि आता तो जास्त पैसे घेणारा सोशल मीडिया वरचा सुपरस्टार झाला आहे. याबद्दल खॅबी ला विचारले तर या सगळ्याचे श्रेय तो त्याच्या चेहऱ्यावरील विनोदी भाव आणि त्याच्या मौनाला दिले आहे, ज्याचे त्याने “शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग” असे वर्णन केले आहे.
कोविड-१९ च्या महामारीच्या काळात खॅबी ला त्याची नोकरी गमवावी लागली परंतु तो हताश न होता प्रयत्न करत राहिला आणि आता तो जास्त पैसे घेणारा सोशल मीडिया वरचा सुपरस्टार झाला आहे. याबद्दल खॅबी ला विचारले तर या सगळ्याचे श्रेय तो त्याच्या चेहऱ्यावरील विनोदी भाव आणि त्याच्या मौनाला दिले आहे, ज्याचे त्याने “शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग” असे वर्णन केले आहे.
खॅबी लेम हा जास्त फॉलॉवर्स असलेल्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे
मग पहिल्या क्रमांकावर आहे कोण ?
तर टिकटॉक च्या पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट्स (US) ची चार्ली द’ अमेलिओ (@charliedamelio) ही आहे. तिचे १३७.७ दशलक्ष (137.7 millions ) इतके फॉलॉवर्स आहेत. चार्ली द’ अमेलिओ ही एक अमेरिकन सोशल मीडिया personality आहे आणि टिक टॉक वर येण्यापूर्वी ती एक डान्सर होती. नंतर २०१९ मध्ये तिने टिक टॉक अकाउंट चालू केले आणि ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करण्याचे तिने व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. फार कमी वेळातच लोकांनी तिच्या व्हिडिओंना पसंती दर्शवली. ती केवळ १९ वर्षांची आहे. आणि फार कमी वेळात तिने स्वतःच्या नावावर २०२१ मधील सर्वात जास्त फॉलॉवर्स असलेली टिक टॉकर चा किताब मिळविला आहे.
टिक टॉक प्रभवाक (influencer) च्या बाबतीत आपला भारत देशही काही मागे नाहीये. टिक टॉक च्या टॉप ५० अकाउंट्स ज्यांचे जगभरात सर्वात जास्त फॉलॉवर्स आहेत त्यात भारताचाही समावेश आहे. रियाझ अली आणि फैसल शेख यांचा टॉप ५० टिक टॉकर मध्ये अनुक्रमे १९ आणि ४५ वा क्रमांक आहे. रियाझ अली चे ४४.७ दशलक्ष (millions) इतके तर फैसल शेख चे ३२.२ दशलक्ष (millions) इतके फॉलॉवर्स आहेत.