क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी – व्यवहाराची आधुनिक पद्धत

क्रिप्टोकरन्सी
क्रिप्टोकरन्सी

आज आपण माहिती जाणून घेणार आहोत क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ची. तुम्ही सध्या बिटकॉइन (Bitcoin) , इथेरियम (etherium), टेथर (tether) यांबद्दल किंवा अश्या अनेक क्रिप्टोकरन्सी बद्दल तुम्ही ऐकले असेल किंवा वाचले असेल किंवा कुठल्यातरी वेब पेज वर इंग्लिश मधील B हे अक्षर असलेले चमकदार कॉइन बघितले असेल. तर हे B हे चिन्ह असलेले कॉइन बिटकॉईन चे चिन्ह आहे. तर या आहेत क्रिप्टोकरन्सी. म्हणजे एक प्रकारचे डिजिटल चलन. हे चलन आपण आपल्या सामान्य चलनांप्रमाने शारीरिकदृष्ट्या व्यवहारासाठी वापरू नाही शकत.

पण त्याचा उपयोग आपण ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो.  स्वस्त्यात मस्त अशी एक चांगली गुंतवणूक (investment) म्हणून लोकं क्रिप्टोकरन्सी कडे वळतात. २०१९ पर्यंत cryptocurrency वर भारतात बंदी होती. ती बंदी २०२० मध्ये हटवली गेली. मिळालेल्या माहितनुसार साधारणतः एक वर्षात क्रिप्टोकरन्सी मधील भारतीयांची गुंतवणूक जवळ जवळ ६५० कोटी डॉलर्स च्या आसपास आहे.

तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर २% ते ३% परतफेड मिळते, बँकेत ठेवले तर ५ ते ७% परतफेड मिळते. पण जर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला कमीत कमी ५०% तरी परतफेड मिळू शकते.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी ही एक व्यवहाराची नवीन पद्धत किंवा प्रकार आहे. क्रिप्टोकरन्सी हे संगणकाच्या साहाय्याने बनवलेले चलन आहे. ही करन्सी कुठेही छापील स्वरूपात नसते म्हणून हिला आभासी चलन असेही म्हणतात. ही करन्सी किंवा चलन तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच खरेदी किंवा विक्री करू शकतात. क्रिप्टोकरन्सी ही एक अशी डिजिटल मालमत्ता किंवा संपत्ती असते जिच्यावर कोणत्याही बँकेचा किंवा आर्थिक संस्थेचे कोणतेही नियंत्रण नसते. यात तुम्ही १ रुपया पासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. क्रिप्टोकरन्सी मधील नफा तोटा हा त्याच्या मागणीवर अवलंबून असतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्या आधी त्याची मागणी किती आहे, त्याची किंमत, त्याचा महिन्याभरात किती उतार चढाव झालंय या सगळ्याचा अभ्यास करून मगच यात गुंतवणूक करावी.

क्रिप्टोकरन्सी चे प्रकार

क्रिप्टोकरन्सी या खूप प्रकारच्या असतात. त्यातला आपण काही बघुयात.

  • बीटकॉइन  – बिटकॉइन ही जगामधली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. ३ जानेवारी २००९ साली सतोशी नाकामोटो यांनी हे चलन अस्तित्वात आणले. तेव्हा या चलनाची किंमत १सेंट इतकी होती. आता एका बिटकॉइन ची किंमत लाखो रुपये आहेत.
  • एथेरियम (Ethereum)  – बिटकॉइन नंतर इथेरियम हे दुसऱ्या नंबर चे चलन आहे. प्रोग्रामर व्हिटलिक बुटरिनने २०१३ मध्ये याचा प्रस्ताव दिला होता.
  • लाइटकॉइन – बिटकाईन ल पर्याय म्हणून लाइटकॉइन ची निर्मिती करण्यात आली. लितकॉइन ची निर्मिती चार्ली ली याने २०११ मध्ये केली. परंतु bitcoin इतके लितेकॉइन ला प्रसिध्दी मिळाली नाही. असे म्हणतात की लितेकॉईन च्या साहाय्याने व्यवहार जलद गतीने होतो.
  • बीटकॉइन कॅश – बीटकॉइन कॅश ही बीटकॉइन ची काही विशिष्ट वैशिष्ये सुधारण्यासाठी तयार केली गेलेली डिजिटल प्रणाली आहे. ज्यामुळे व्यवहार अधिक वेगवान पद्धतीने होऊ शकतील.
  • झीकॅश – झीकॅश ही अशी क्रिप्टोकरन्सी आहे जिचा मुख्य उद्देश क्रिप्टोग्राफी चा वापर करून वापरकर्त्यांचे व्यवहार आणि माहिती इतर क्रिप्टोकरन्सी च्या तुलनेने गोपनीय ठेवणे. झीकॅश ही मूळ बीटकॉइन च्या कोड बेसवर तयार केले गेलेले आहे.

अशेच अजून १००० हून अधिक क्रिप्टोकरन्सी आहेत.

क्रिप्टोकरन्सी चे फायदे

  • क्रिप्टोकरन्सी ने व्यवहार अगदी जलद रित्या करता येतात.
  • या द्वारे व्यवहार करण्यासाठी अगदी नगण्य फी आकारली जाते.
  • इतर व्यवहार पद्धती प्रमाणे क्रिप्टोकरन्सी मार्केट ल कुठलीही वेळेची मर्यादा नसते.
  • क्रिप्टोकरन्सी चे मार्केट वर्षाचे ३६५ दिवस २४ तास चालू असते. त्यामुळे व्यवहार करणे अगदी सोपे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *