चंद्रमुखी
चंद्रमुखी

पुष्पा- द राईज, RRR , KGF हल्ली सगळीकडे साऊथ च्या चित्रपटांची चर्चा चालू आहे. त्यांच्या चित्रपटांची गाणी, कथा, अभिनेते, अभिनेत्री या सगळ्यांनी साऱ्यांनाच वेड लावले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड चे ही चित्रपट एकामागून एक येतच होते. जसे की बच्चन पांडे, रन वे ३४, भूलभुलैया २ वैगरे वैगरे. दाक्षिणात्य चित्रपट झाले, बॉलिवूड चेही चित्रपट झाले मग आपले मराठी चित्रपट कसे मागे राहतील…

सध्याच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टी देखील मागे राहिलेली नाही. मराठीतही एकापेक्षा एक चित्रपटांची रांग लागलेली आहे. ‘ पावनखिंड ‘ ‘ शेर शिवराज ‘ आणि आता तर आली आहे ‘ चंद्रमुखी ‘. जिथे बॉलिवूड आणि टोलीवुड चे चित्रपट हजार करोडोंचा टप्पा पार करत होते तिथेच आपले मराठी चित्रपट ही त्यांच्या मागोमाग करोडोंच्या घरात येत आहेत. ‘ पावनखिंड ‘ आणि ‘ शेर शिवराज ‘ या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

चंद्रमुखी

‘ चंद्रमुखी ‘

हा चित्रपट नुकताच म्हणजे २९ एप्रिल ला रिलीज झाला. या चित्रपटात चंद्रमुखी म्हणजेच चंद्राच्या भूमिकेत आहे अमृता खानविलकर आणि दौलतराव च्या भूमिकेत आहे आदिनाथ कोठारे. हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे प्रसाद ओक यांनी. या चित्रपटाची कथा ही तमाशामधील नर्तिका आणि गायिका असलेली चंद्रा आणि राजकारणी दौलत यांच्या प्रमकाहानीवर आधारलेला आहे. या चित्रपटातील गाण्यांनी केवळ मराठी माणसांना किंवा मराठी कलाकारांना च नाही तर बॉलिवूड कलाकारांनाही वेड लावले आहे. या चित्रपटाला संगीत दिले आहे अजय अतुल या जोडीने.

‘ चंद्रा ‘ हे गाणे खूप लोकप्रिय झाले आहे.

त्याचबरोबर ‘ बाई ग…..’ हे गाणे. या गाण्यातील अमृता खानविलकर चे हावभाव तिची या गाण्यासाठीची मेहनत फळाला नेते.

हा चित्रपट तमाशावर आधारित आहे आणि तमाशा म्हटलं की सवाल जवाब नाही असे होऊच शकत नाही. पूर्वीच्या काळी तमशावर चित्रपट जास्त असायचे. आणि त्यात सवाल जवाब असायचाच असायचा. आणि तो ऐकायलाही खूप मनोरंजक असायचा. तसाच सवाल जवाब याही चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो.

या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे या कलाकारांबरोबरच प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, समीर चौघुले आणि राजेंद्र शिरसाटकर हे देखील कलाकार दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *