लाखो रुपयांना विकला गेला जगातला पहिला एसएमएस

लाखो रुपयांना विकला गेला जगातला पहिला एसएमएस!

लाखो रुपयांना विकला गेला जगातला पहिला एसएमएस
ऑर्बिटल ९०१

हल्ली डिजिटल चा जमाना आहे. संदेश पाठवायचा असेल तर व्हॉट्स ॲप, मेसेंजर किंवा अजून कशावरून संदेश पाठवला जातो. पण पूर्वी हे व्हॉट्स ॲप किंवा मेसेंजर हे असे संदेश पाठवायचे ॲप्स नव्हते. मग कसे पाठवायचे संदेश तर टेक्स्ट मेसेज (Text message) ने. आताही टेक्स्ट मेसेज चा वापर होतो पण पूर्वी पेक्षा खूप कमी. पूर्वी टेक्स्ट मेसेज पाठवायला पैसे मोजावे लागत असे म्हणजेच एसएमएस पाठवला की आपले पैसे कट होत. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की कोणाला तरी पाठवलेला एसएमएस विकल्याने पैसे मिळालेत. नाही ना?

तर हो! वोडाफोन कंपनीने नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंट वर हे घोषित केले होते की “जगातील पहिला एसएमएस विकणार आहे” हा एसएमएस खूप मोठा वैगरे नसून फक्त १४ अक्षरांच्या शुभेच्छा होत्या.

हा टेक्स्ट मेसेज पाठवला होता ३ डिसेंबर १९९२ ला. जो पाठवला होता नील पोपवॉर्थ (Neil Popworth) ने आपल्या संगणकाद्वारे, रिचर्ड जार्विस (Richard Jarvis) याला, त्याच्या ऑर्बिटल ९०१ या मोबाईल वर. नील पोपवॉर्थ हे वोडाफोन कंपनीमध्ये डेव्हलपर आणि टेस्ट इंजिनिअर म्हणून काम करत होते. आणि रिचर्ड जार्विस हे तेव्हा वोडाफोन कंपनी चे डायरेक्टर होते. ख्रिसमस च्या शुभेच्छा देणारा हा टेक्स्ट मेसेज वोडाफोन चे नेटवर्क वापरून पाठवण्यात आला होता.

या टेक्स्ट मेसेज ची विक्री वर्चुअल टोकन म्हणजेच NFT स्वरूपात होणार होती. NFT (Non Fungible Token) ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता/संपत्ती किंवा डेटा असतो. NFT हे एक डिजिटल टोकन आहे जे तुम्ही एखादी वस्तू म्हणजे पेंटिंग, गेम्स, किंवा कार्ड्स अशा वस्तुंद्वारे असाईन करू शकता किंवा नेमून ठेवू शकता. NFT हे क्रिप्टोकरन्सी (crypto currency) सारखी cryptographic मालमत्ता आहे जे ब्लॉक चैन वर नमूद केले जाते. आपण NFT वर एक स्वतंत्र लेख लवकरच वाचाल.

जगातल्या या पहिल्या एसएमएस ची विक्री पॅरिस मध्ये एगट्स ऑक्‍सन हाउस इथे २१ डिसेंबर ला डिजिटल स्वरूपात होणार होती. या एसएमएस ची डिजिटल प्रत करोडो रुपयांना विकली जाऊ शकते असा अंदाज होता. आणि खरंच हा एसएमएस १०७,००० युरोस (Euros) म्हणजे १२१००० डॉलर (Dollar) ला विकला गेला. भारतीय रुपयांमध्ये आपण जर विचार केला तर या मेसेज ची किंमत जवळ जवळ ९१ लाखांपेक्षा जास्त आहे.

या विक्रिद्वारे मिळणारी रक्कम ही यूएनएचसीआर- यूएन रिफ्यूजी एजेंसी ला त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी देण्यात येणार आहे असेही वोडाफोन कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंट वर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *