जय भीम चित्रपट
जय भीम चित्रपट
जय भीम चित्रपट

सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.  त्याचे नाव आहे “जय भीम”. हा एक तमिळ चित्रपट आहे आणि आता दिवाळीमध्ये म्हणजे २ नोव्हेंबर २०२१ ला रिलिज झाला. या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसत आहेत आपले तमिळ सिंघम म्हणजेच सूर्या. “जय भीम” या चित्रपटाची निर्मिती सूर्या सर आणि त्यांची पत्नी ज्योतिका यांनी दोघांनी केली आहे. याचे दिग्दर्शक आहेत टी. जे. ज्ञानवेल. २-डी एन्टरटेन्मेंट या अंतरर्गत सिनेमाची निर्मिती केली आहे.

काय आहे “जय भीम” चे कथानक?

या चित्रपटाची गोष्ट एका इरुलर जमातीतील कुटुंबातील लोकांवर झालेल्या अन्यायाविषयी आहे. राजकन्नू आणि सेंगानी हे इरूलर समाजातील जोडपे. एका उच्च जातीच्या लोकांच्या शेतात उंदरांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्याचे आणि विषारी साप पकडण्याचे काम करत असत. एकदा राजकन्नू ला एका श्रीमंत माणसाच्या घरात साप शिरला असल्याने तो पकडायला बोलवतात. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या श्रीमंत माणसाची पत्नी तिच्या कपाटातून दागिने हरवल्याचे सांगते आणि पोलिसांकडे तक्रार करते. आणि राजकन्नू वर संशय निर्माण करते. मग पोलिस राजकन्नू ला पकडायला जातात पण तो कामा निमित्त बाहेर गेला असल्याने तो पोलिसांना सापडत नाही. राजकन्नू आणि त्याचा परिवार गरीब जमातीतील असल्याने पोलिस त्यांच्यावर खूप अत्याचार करतात, क्रूरपणे त्यांची छळवणूक करतात आणि खोटा गुन्हा कबूल करून घेतात.

या सगळ्यात गर्भवती असलेली राजकन्नू ची पत्नी सेंगानी हिला चंद्रू नावाच्या वकील बद्दल कळते. चंद्रू हे पात्र अभिनेता सूर्या याने साकारले आहे. चंद्रू हा आदिवासी समुदायासाठी खटले लढवतो आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारां विरूद्ध आवाज उठवतो.

मग सेंगानी चंद्रू कडे जाते आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते आणि न्याय मिळावा म्हणून विनंती करते. मग चंद्रू “हेबियस कॉर्पस” म्हणून कोर्टात केस दाखल करतो.

“हेबियस कॉर्पस” म्हणजे काय?

हेबियस कॉर्पस” म्हणजे हे एक प्रकारचे न्यायालयीन आदेशपत्र किंवा आज्ञापत्र असते की एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर पणे अटक केली किंवा तुरुंगवास केले तर त्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर करावे आणि त्याच्या विरूद्ध केलेल्या तक्रारीची सत्यता सांगावी.

या सगळ्यातून चंद्रू राजकन्नू ला सोडवतो की नाही ? सेंगानी ला न्याय मिळतो की नाही हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

“जय भीम” या सिनेमाची गोष्ट ही १९९३ मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. आणि न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी हा खटला चालवला होता.  सध्यातरी बॉक्स ऑफिस म्हणा IMBD चे रेटिंग म्हणा किंवा फेसबुक पोस्ट्स बघा सगळीकडे “जय भीम” याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *