डिस्कवरी वाहिनी

लहान मोठ्यांची आवडती – डिस्कवरी वाहिनी

डिस्कवरी वाहिनी
डिस्कवरी वाहिनी

आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की आजच्या पिढीला घरी बसल्या बसल्या सगळ जगाचे ज्ञान त्यांना मिळते. मग ते दूरचित्रवाणी (टी. व्ही.) असो किंवा संगणक (कॉम्पुटर) असो वा मोबाइल. पण यांनी फक्त ज्ञानच नाही तर मनोरंजनही होते. कॉम्पुटर आणि मोबाइल यावर आपण पाहिजे ते सर्च करू शकतो किंवा पाहू शकतो. पण टी. व्ही. वर मात्र असे करता येत नाही. टी. व्ही. वर जे प्रोग्राम ठरलेले असतात ते आपण बघतो. टी. व्ही. वर बऱ्याच अश्या वाहिन्या (चॅनल्स) असतात ज्यावर आपण चित्रपट , मालीका (सीरिअल्स), कार्टून्स, बातम्या, किंवा अजून काही बघतो. त्या पैकीच डिस्कवरी (Discovery) ही एक वाहिनी आहे.

डिस्कवरी (Discovery) या शब्दाचा अर्थ ‘शोध’ असा होतो. To Discover म्हणजे शोधणे. डिस्कवरी (Discovery) नावाच्या अर्थाप्रमानेच त्यावर चालणारे कार्यक्रम हे देखील तेवढेच अर्थपूर्ण असतात. डिस्कवरी वाहिनी वर आपण वन्य जीवन (wild life), प्राणी जीवन (animals life), मानव जीवन, विज्ञान, भूगोल, इतिहास आणि बरच काही आपल्याला या वाहिनी वर बघायला मिळते.

डिस्कवरी वाहिनी चे प्रक्षेपण सर्व प्रथम १७ जून १९८५ ला झाले. डिस्कवरी वाहिनी हि एक अमेरिकेतील पेड दूरचित्रवाणी नेटवर्क म्हणजेच अशी चॅनेल जे बघण्यासाठी पैसे भरावे लागतात. डिस्कवरी हि “Discovery Inc.” या कंपनीच्या मालकीची प्रमुख वाहिनी आहे. डेव्हिड झासलव हे या कंपनी चे सीईओ आहेत. या वाहिनी चे प्रसारण जगभरात होते. या कंपनी चे हेडक्वार्टर सिल्व्हर स्प्रिंग (Silver Spring) आणि मेरीलँड (Maryland) इथे आहेत. जून २०१२ पर्यंत डिस्कवरी वाहिनी हि सर्वाधिक सदस्यता असलेले तिसऱ्या क्रमांकाचे चॅनेल होते. सर्वाधिक सदस्यता असलेले पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे चॅनल्स ‘टी बी एस’ आणि ‘द वेदर’ हे होते.

सुरुवातीच्या काळात डिस्कवरी चॅनल ने लोकप्रिय विज्ञान , तंत्रज्ञान आणि इतिहास यावर प्रोग्रॅम बनवले. पण २०१० नंतर डिस्कवरी चॅनल हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतिहास यावरच मर्यादित न राहता पुढे त्याचा विस्तार रिॲलिटी टेलिव्हिजन, छद्म वैज्ञानिक, मनोरंजन असा होत गेला.

१९८८ मध्ये डिस्कवरी चॅनल ने ‘शार्क-वीक’ नावाच्या वार्षिक प्रोग्रामिंग स्टंट ची सुरुवात केली. १९९० पासून या प्रोग्रॅम ला लोकप्रियता मिळाली. २००० मध्ये लोकांना अधिक आकर्षित करण्यासाठी डिस्कवरी चॅनल ने काही रिऍलिटी मालिकांची हि सुरुवात केली परंतु या त्या पहिजे तेवढ्या यशस्वी होऊ शकल्या नाही. त्यामुळे या दशकाच्या अंती discovery channel चे रेटिंग कमी होऊ लागले. नंतर २००५ मध्ये Discovery ने पॉप्युलर सायन्स आणि ऐतिहासिकता यावर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला. आणि २००६ मध्ये डिस्कवरी चे रेटिंग पुन्हा वाढू लागले.

Man vs wild

यानंतर डिस्कवरी चॅनल ने मुख्यत्वे करून तपास (Investigation) स्टोरीज जसे की ‘मिथबस्टर’, ‘अनसॉल्व्हड हिस्टरी’आणि ‘बेस्ट एव्हिडन्स’ या शो (show) सोबतच ऑटोमोबाइल्स आणि व्यवसाय जसे की ‘डर्टी जॉब्स’ आणि ‘डेडलीएस्ट कॅच’ अशा रिॲलिटी मालिकांवर लक्ष केंद्रित केले. तसेच इतर लोकप्रिय प्रोग्रॅम मध्ये ‘हाऊ इट्स मेड’ याचा साधारणतः अर्थ होतो, ‘हे कसे बनते’, ‘कार कॅब्स’ आणि आपल्या आवडत्या ‘बेअर ग्रिल्स’ च्या ‘Man vs wild’ या शो चा देखील समावेश आहे.

डिस्कवरी चॅनल हे १७० देशांमध्ये ४०० ते ४५० दशलक्ष घरांमध्ये पोहोचलेले आहे. डिस्कवरी कम्युनिकेशन्स सध्या ३३ भाषांमध्ये २९ नेटवर्क ब्रँड ऑफर करतात. बऱ्याच देशांमध्ये डिस्कवरी चे चॅनल्स डिजिटल सॅटेलाईट प्लॅटफॉर्म यासोबतच साऊंड ट्रॅक किंवा सब टाइल्स तसेच विविध भाषा (स्पॅनिश, जर्मन, रशियन, झेक, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, डच, पोर्तुगीज, इटालियन, नॉर्वेजियन, स्वीडिश, डॅनिश, फिनिश, तुर्की, ग्रीक, पोलिश, हंगेरियन, रोमानियन, अरबी, स्लोव्हेन, जपानी, कोरियन आणि सर्बियन) यांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *