डॉलर च्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण

भारतीय रुपयाची घसरण
भारतीय रुपयाची घसरण

आजकाल महागाई खूप वाढत चालली आहे. सोने चांदी पासून पेट्रोल डिझेल पर्यंत, भाजी पाल्या पासून किराणा माल पर्यंत सगळ्याचेच भाव वाढलेले. गुंतवणूक महागली, व्याजदर महागले, एवढेच काय तर भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर महागले. म्हणजेच आपल्या भारतीय रुपयाची किंमत इंटर नॅशनल बाजारात घसरली. आणि घसरते आहे. मग ही वाढलेली डॉलर ची किंमत किंवा भारतीय रुपयाची घसरलेली किंमत कोण ठरवते ? कोणी ऑर्गनायझेशन की कोणती बँक की कोणी एखादी व्यक्ती..

कोण ठरवते भारतीय रुपयाची किंमत डॉलर च्या तुलनेत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आपल्याला नेहमी वाटते हे वाढलेले बँकांचे दर, कमी झालेला इंटरेस्ट रेट, गुंतवणूक, लोन किंवा रुपयांच्या बाबतीतील प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही RBI ( रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ठरवते. हे खरे असले तरी जागतिक स्तरावर RBI भारतीय रुपयाची किंमत ठरवत नाही.

RBI हीच काय तर कोणतीही संस्था ही किंमत ठरवत नाही.

भारतीय रुपयाची किंमत ही जागतिक बाजारातील त्याच्या मागणी आणि पुरवठा म्हणजेच Demand and Supply यावर अवलंबून असतो. जेवढी जागतिक बाजारात भारतीय रुपयाला मागणी जास्त तेवढी रुपयाची किंमत वाढते. आणि जेवढी ती मागणी कमी झाली तेवढी रुपयाची किंमत घसरते. सध्या डॉलर च्या तुलनेत भारतीय रुपया खूप खाली घसरला आहे. म्हणजेच आपल्याला एका डॉलर मागे ७९.७२ इतके भारतीय रुपये मोजावे लागतात. ही डॉलर आणि रुपयामधली एवढी तफावत ही सुरुवाती पासूनच होती पण ती एवढी मोठ्या प्रमाणात नव्हती. जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणजे १५ ऑगस्त १९४७ ला १ डॉलर = ३.३० रुपये इतके होते. ही डॉलर आणि रुपयाची किंमत दोन तीन वर्षे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त झाली. पण १९६६ साली ही तफावत जास्त वाढत गेली. याचे कारण होते १९६६ साली भारतात आर्थिक मंदी पसरली होती आणि याचाच खूप मोठा परिणाम रुपया वर झाला. १९६६ मध्ये रुपयाची किंमत आणखी घसरून ७.५० रुपये प्रति डॉलर इतकी झाली. हीच तफावत वाढत जाऊन आज भारतीय रुपयाची किंमत ७९.७२ प्रती डॉलर इतकी घसरली आहे.

रुपयाच्या घसरणीची कारणे कोणती

तसे बघायला गेलो तर रुपयाच्या घसरणीची खूप करणे आहेत त्यातली काही म्हणजे :

१) कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ – भारत हा कच्च्या तेलाची आयात करणारा एक मोठा देश आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या PPAC च्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंतच्या काळात भारताने तेल आयातीवर ११९.२ अब्ज डॉलर इतके खर्च केले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ हे मोठ कारण आहे जागतिक बाजारात रुपयाची घसरण होण्यामागे.

२) परकीय चलनात गुंतवणूक – cryptocurrency बद्दल तर माहीतच असेल. या अशा आणि अनेक प्रकरच्या परकीय चलनात किंवा परकीय शेअर्स मध्ये गुंतवणूक हे सध्याचे भारतीय लोकांचे आकर्षण बनलेले आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.

३) जागतिक अर्थशास्त्र – जागतिक बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार आपले भांडवल यूएस ट्रेझरी, सोने, स्विस फ्रँकसह इतर सुरक्षित चलनांमध्ये ठेवण्यास इच्छुक असतात. परिणामी रुपयाच्या तुलनेत डॉलर ची मागणी वाढते.

४) आयात आणि निर्यात – भारताची वाढत चाललेली आयात आणि कमी होत चाललेली निर्यात हेही रुपयाच्या मूल्यात घसरणीचे कारण आहे. आयातीमध्ये भारतीय रुपये बाहेर जातात आणि निर्यातीमध्ये बाहेरील चलन भारतात येते. म्हणजेच जेवढ्या मोठ्या प्रमाणात आयात तेवढे जास्त रुपये बाहेर जाणार आणि निर्यात कमी झाली तर परकीय चलन हवे तेवढे येणार नाही परिणामी आपल्याकडे परकीय चलनाची कमतरता जाणवेल आणि जागतिक बाजारात रुपयाची ही घसरण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *