“ तुझी माझी जोडी जमली अशी फकाट पोरगी पटली…. “ आठवले का हे गाणे. आठवणच. “ माझा पती करोडपती “ या मराठी चित्रपटातील हे गाणे आहे. १९८८ च्या काळात आलेला हा चित्रपट तुफान चालला. या चित्रपटात सगळीच गाणी हिट होती. हा चित्रपट दिग्दर्शित केला होता सचिन पिळगावकर यांनी. पूर्वी अशोक सराफ, सचिन आणि लक्ष्मीकांत बेड्रे म्हणजेच आपला लक्ष्या या तिघांची जोडी म्हणजे चित्रपट होतच होणार. तेव्हा या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, निळू फुले, सुप्रिया पिळगावकर, किशोरी शहाणे असे दिग्गज कलावंत होते.
तर आपण बोलत आहोत “ तुझी माझी जोडी जमली “ या गाण्याविषयी. तेव्हा हे गाणे अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्यासोबत चित्रित केले होते. हे गाणे गायले होते अशोक कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी. आणि अजूनही हे ‘ evergreen ‘ गाणे आपण ऐकले तरी आपण नकळत ते आपण गुणगुणू लागतो. या गाण्याची मजा आजूनही आपल्याला तेवढीच येते जेवढी पूर्वी यायची. पण आताच्या पिढीला पूर्वीच्या गाण्यातील मजा कळणार नाही. पण तेच गाणे नवीन रंगात आणि नवीन ढंगात आले तर. हो हेच गाणे आपल्याला आता पुन्हा बघायला मिळणार आहे ते हेमंत धिमे याच्या नव्या चित्रपटातून.
हेमंत ढोमे याने तुझी माझी जोडी जमली हे गाणे रिक्रिएट केले आहे. आणि आता या गाण्यात आपल्याला बघायला मिळणार आहे नवीन जोडी ती म्हणजे हेमंत ढोमे आणि अनुजा साठे. या गाण्यात हेमंत ढोमे ने रेट्रो लूक देत थोडीफार अशोक मामा साकारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. हे गाणे गेले आहे हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे या दोन गायकांनी आणि संगीत दिले आहे ‘ ट्रिनिटी ब्रदर्स’ हर्ष, करण, आदित्य आणि यांना साथ मिळाली आहे शांताराम नांदगावकर यांची. ‘ फकाट ‘ हा चित्रपट लवकरच म्हणजे १९ मे ला प्रदर्शित होणार आहे. तर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘ फकाट ‘.