पुष्पा

पुष्पा – द राईज | अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट

पुष्पा - अल्लू  अर्जुन
पुष्पा

आज आपण बोलणार आहोत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन ज्याला आपण बनी म्हणून पण ओळखतो. खरंतर त्याला वेगळ्या इंट्रोडक्शन ची गरज नाही. अल्लू अर्जुन हा साऊथ इंडियन चित्रपट मधला सर्वात नावाजलेला कलाकार आहे.

तो त्याच्या डान्स आणि अक्शन्स मुळेही प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्या ॲक्टिंग च्या जोरावर खूप सारे अवॉर्डस् पण मिळवले आहेत.

त्याचे सगळेच चित्रपट खूप गाजतात, काही चित्रपटांमधील त्याचे पात्र लोकांच्या मनात घर करून बसतात जसे की सन ऑफ सत्यमुर्ती, सर्रेनोडू, अला वैकांटपुरमालू.

अल्लू अर्जुनचा शेवटचा पिक्चर अला  वैकांटपुरमालू  हा आपण बघितलेलाच असेल. हा पिक्चर दिग्दर्शित केला होता त्रिविक्रम श्रीनिवास यांनी. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिस  २६२ करोड इतकी भरघोस कमाई केली होती.

  आता त्याच्या चाहत्यांना त्याच्या नवीन चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

पण ही उत्सुकता लवकरच पूर्ण होणार आहे. अल्लू अर्जुन आपल्याला लवकरच त्याच्या नवीन चित्रपटातून दिसणार आहे ज्याचे नाव आहे पुष्पा.

हा एक अक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले असून ‘मिथ्री मूव्ही मेकर्स’ अंतर्गत ‘मुत्तमसेट्टी मीडिया’ सह देवी प्रसादने संगीत मिळवत संगीत निर्मिती केली आहे. या चित्रपटाची गोष्ट भारतात होणाऱ्या चंदन तस्करीवर आधारित असणार आहे.

हा चित्रपट दोन भागांत प्रकाशित होणार आहे. पहिला भाग पुष्पा – द राईज (Pushpa-the rise part 1) आणि दुसरा भाग नंतर तो कळेलच आपल्याला.

या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत प्रकाश राज, रष्मिका मंडणा ही देखील दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट २०२१ मध्ये प्रकाशित होणार होता. परंतु कोरोना महामारीच्या परिस्थितीत या चित्रपटाची प्रकाशन तारीख पुढे ढकलून येत्या १७ डिसेंबर २०२१ ला केली आहे. चित्रपट तेलगू भाषेसोबतच हिंदी , तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये देखील असणार आहे.

अल्लू अर्जुन च्या ईतर चित्रपटांप्रमाने हा चित्रपट देखील प्रेक्षकांमध्ये तितकाच खरा उतरेल, आणि ऑफिसवर किती कमाई करेल हे बघूच आपण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *