जून जुलै महिना चालू झाला की हळू हळू चाहूल लागते ती पावसाची. पावसाळा कोणाला आवडत नाही. सगळ्यांनाच आवडतो. प्रत्येकाला पावसात भिजायला आवडते. पावसाळा सुरू झाला की सर्दी खोकला वैगरे वैगरे आजार चालू होतात. पण आपण त्याकडे फारसे लक्ष देतो न देतो असे करतो. पण याही व्यतिरिक्त या बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर किंवा आपल्या केसांवर देखील होतो. स्त्रियांसाठी त्यांचे केस हे खूप किमती किंवा अनमोल म्हणजेच खूप महत्वाचे असतात. स्त्रियांसाठी च काय तर पुरुषांसाठी देखील त्यांचे डोक्यावरचे केस खूप प्रिय असतात.
आजकालच्या वातावरणाचा किंवा बदलत्या लाईफ स्टाईल चा देखील आपल्या केसांवर परिणाम होत असतो. मग केस गळती, केस पांढरे होणे, अशा समस्या निर्माण होतात. आजकाल यावर खूप सारे उपाय आहेतच पण तरीही घरगुती उपायांना लोकं जास्त प्राधान्य देतात. केसगळतीवर असाच एक घरगुती उपाय म्हणजे माक्याचे तेल.
माका ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पती पासून तेल बनवले जाते. भृंगराज किंवा महा भृंगराज यालाच मराठी मध्ये माका असे म्हणतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशीयम ही खनिजे आणि व्हिटामिन ‘डी’ आणि ‘ई’ हे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेला माका केसांच्या आरोग्यासाठी उत्तम काम करतो.
बहुगुणी आणि बहुउपयोगी असा भृंगराज म्हणजेच माका
या माक्याच्या तेलामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे किंवा चाई यावर चांगला परिणाम दिसून येतो.
माक्याला पितृपंधरवड्यात विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त असते. माक्याचे तेल हे मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध असते. शिवाय Amazon सारख्या ऑनलाईन साईट वर देखील हे तेल उपलब्ध आहे. रोज किंवा एक दिवस आड असे या तेलाने १० ते १५ मिनिट केसांची हलक्या हाताने मालिश करावी. जेणेकरून हे तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल.
माक्याच्या तेलाचा उपयोग फक्त केसांसाठी च नव्हे यकृतासंबंधीचे विकार, भूक न लागणे, अजीर्ण, पोटाचे विकार यांवर माका उत्तम कार्य करतो. त्वचाविकारांवर देखील माका प्रभावी काम करतो. त्वचेवर खाज येणे, बारीक पुरळ उठणे, सूज येत असेल तर माक्याचा रस चोळावा. याव्यतिरिक्त या तेलाच्या वापराने डोकेदुखी थांबणे, शांत झोप लागणे, कोंडा कमी होणे शिवाय त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.