क्रिकेट म्हटले की सगळ्यांचाच आवडता खेळ. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत अगदी सर्वांचाच आवडता खेळ. क्रिकेट मॅच मग कोणतीही असो आयपीएल असो, वर्ल्ड कप असो वा टी-२० असो उत्सुकता एकच असते. आताच आयपीएल संपली आणि धोनीची टीम चांगलीच खेळली. आता टी-२० चालू होणार आहे हेही सगळ्यांनाच माहितीये. पण या टी-२० ची टीम इंडियाची एक खास गोष्ट माहितीये का ?.
काय आहे बिलियन चीयर्स जर्सी ?
ती खास गोष्ट आहे टिम इंडियाच्या जर्सी ची. आता जर्सी ची काय खास गोष्ट असणार असे तुम्ही म्हणाल. पण या वेळेची टीम इंडियाची जर्सी खूप खास आहे. कारण ही जर्सी क्रिकेट च्या अब्जाधीश चाहत्यांच्या नामजप, घोषणांचे स्मरणार्थ बनवली गेली आहे. सामन्यांमधील चाहत्यांचे नामघोष आणि चिअर्स हे साउंडवेव्ह पॅटर्नमध्ये रूपांतरित करून या जर्सी वर बनवले आहेत.
असे टीम च्या जर्सी वर चाहत्यांचे स्मरण करणे हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. ‘बिलियन चीयर्स जर्सी’ असे या जर्सी ला नाव दिले गेले आहे. आणि १९ वर्षाखालील (under- 19) पुरुष आणि महिला भारतीय संघाचे अधिकृत किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने त्याचे अनावरण केले आहे.
“जर्सीवरील नमुने चाहत्यांच्या अब्जावधी चीयर्सने प्रेरित आहेत.” असे बीसीसीआय ने ट्विट केले आहे. ही जर्सी तुम्ही http://mplsports.in इथून खरेदी करू शकता असेही त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे. ही जर्सी प्रशियन निळ्या आणि शाही निळ्या रंगात आहे.
२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. भारताची पहिली मॅच पाकिस्तानशी २४ ऑक्टोबर ला आहे. तर मग टी-२० सामन्यांच्या मेजवानी साठी तयार आहेत ना!!