आजकाल चा जमाना हा डिजिटल चा जमाना आहे. हा डिजिटल चा जमाना डिजिटल मार्केटिंग पासून डिजिटल इंडिया पर्यंत पोहोचला आहे. आज अशाच एका डिजिटल वाहिनी ची सगळीकडे जरा जास्त जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ही डिजिटल वाहिनी हिंदी किंवा इतर भाषेमधील नसून चक्क आपल्या मराठी भाषेतील आहे. भाडिपा अर्थातच भारतीय डिजिटल पार्टी (Bhartiy Digital party ). आठवलेच असतील यातले काही एपिसोड. मनोरंजन च्या क्षेत्रात या वाहिनीने एक वेगळीच बाजी मारली आहे. वेगळे विषय आणि काहीतरी नवनवीन हे या भाडिपाचे वेगळेपण आहे.
‘ 9 To 5 ‘ असो , ‘ आई आणि मी ‘ किंवा आताची नवीन सिरीज ‘ बी. ई. रोजगार’ असो. प्रत्येक सिरीज मध्ये वेगळे पण असते.
बी. ई. रोजगार की बेरोजगार
भाडिपा ची सध्याची चालू असलेली ‘ बी. ई.रोजगार ‘ या वेब सिरीज ला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. खर म्हणजे या सिरीज चे खरे नाव ‘ बी. ई. रोजगार ‘ आहे. पण वरकरणी या मालिकेला सगळे ‘ बेरोजगार ‘ म्हणूनच संबोधतात. खऱ्या अर्थाने ही दोन्हीही नावे या वेब सिरीज ला साजेशि आहेत. इंजिनिअर म्हटले की डिग्री करून बाहेर पडलेले लाखो तरुण आपल्याला डोळ्यांसमोर दिसतात. जे काही ना काही धडपड करत असतात काम मिळवण्यासाठी. अशाच इंजिनीअरिंग पूर्ण केलेले तिघेजण ज्यांना रोजगार उपलब्ध नाही अश्या बेरोजगारांवर ही मालिका आधारलेली आहे.
या सिरीज मध्ये आपल्याला दिसणार आहेत तीन पात्र. पपड्या, पियु आणि अक्षय. पपड्या आणि अक्षय हे पात्र साकारले आहे अनुक्रमे संभाजी ससाणे आणि जगदीश कन्नम यांनी. आणि पियु चा रोल साकारला आहे सई ताम्हणकर हिने. सई म्हणजेच पियु ही जी विदर्भातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग उत्तीर्ण होऊन कामाच्या शोधात आहे. तिच्यासोबत च पपड्या आणि अक्षय हे देखील काहीतरी रोजगार मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.
बी. ई. रोजगार ची शूटिंग ही पुणे आणि इचलकरंजी इथे झाली आहे. ही सिरीज लिहिली आहे सौरभ शामराज आणि दिग्दर्शित केली आहे सारंग साठ्ये यांनी. बी. ई. रोजगार ही भाडीपाची नवीन वेब सिरीज आधारलेली आहे तीन बेरोजगार इंजिनिअर आणि काम मिळवण्याकरिता चाललेला त्यांचा संघर्ष यावर. हे तीन इंजिनिअर आपल्याला आठवण करून देतात, आपल्याला जाणवून देतात की प्रत्येक इंजिनिअर जो बेरोजगार आहे तो काम मिळवण्यासाठी किती आटापिटा करत असतो. भाडिपाच्या या तीन बेरोजगारांना लोकांनी खूप पसंत केले आणि पहिल्याच दोन एपिसोड ला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. याचे नवीन एपिसोड दर शुक्रवारी रिलीज होतात. आणि या सीरिज ला IMDB वर ९.३/१० असे रेटिंग मिळाले आहेत.
भाडीपाचे बी. ई. रोजगार या सिरीज बरोबरच 9 to 5 ही वेब सिरीज जी आधारलेली आहे एका तरुण मुलावर जो आहे सासवड चा आणि एका ॲड एजन्सी मध्ये इन्टर्न म्हणून लागला आहे आणि अशी आशा करतो की तो पर्मनंट व्हावा. आणि मग होणारे विनोद, त्याच्या मनात चालणारी घालमेल हे सगळं आपणही कधीतरी अनुभवलय याची आठवण करून देते.
भाडिपाची अजून एक सिरीज म्हणजे ‘ आई आणि मी ‘ यातील आई मी आणि प्रायव्हसी, आई मी आणि आळस अशा बऱ्याच एपिसोड ला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.