Baby’s day out

हा गोंडस बाळाचा अपहरणपट आठवतोय का ?

आपण कितीतरी चित्रपटांची गोष्ट बघतो की ज्यात एक खतरनाक चोर एका पैसेवाल्या माणसांची मुले पळवतात आणि त्याबदल्यात खूप सारे पैसे मागतात. हे आपल्याला जितके भयानक आणि भीतीदायक वाटते पण तेच जर गोंडस, गोजिरवाणे, मजेशीर आणि थोडेफार थरारक असे सगळे जर या अश्या “अपहरणाची गोष्ट” असलेल्या चित्रपटात पाहायला मिळाले तर? आणि, आपण ती पाहिली सुद्धा आहे. हो! आठवले का “बेबीज डे आऊट” (BABY’S DAY OUT).

या चित्रपटात कसे ३ चोर एका १, दिड वर्षांच्या मुलाला पळवतात आणि त्याबदल्यात त्याच्या घरच्यांकडून पैसे मागायचे ठरवतात. परंतु त्यांचा हा सगळा प्लॅन तो छोटुसा गोंडस मुलगा कसा धुळीस मिळवतो, हे यात आपल्याला बघायला मिळते.

Baby’s day out हा चित्रपट १ जुलै १९९४ मध्ये रिलिज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते पॅट्रिक रिड जॉन्सन आणि प्रोडुसर म्हणजे निर्माते होते जॉन ह्यूज (John Hughes) आणि रिचर्ड वेन (Richard Vane). या चित्रपटाची गोष्ट लिहिली होती जॉन ह्यूज यांनी. चित्रपटाचे बजेट होते ४८ दशलक्ष डॉलर्स आणि या चित्रपटाने कमावले ३० दशलक्ष डॉलर्स. हा चित्रपट त्या काळात फ्लॉप ठरला. परंतु या चित्रपटाची गोष्ट खूप सुंदर होती पण त्याही पेक्षा सर्वात जास्त सुंदर होते ते या चित्रपटातील गोंडस बाळ आणि त्याच्याकडून करून घेलेले काम.

या चित्रपटात बाळाचा रोल हा एका बाळाने नाही तर दोन बाळांनी केलेला होता. हो हो, हे खरे आहे. या चित्रपटात लहान बाळाचा रोल केला होता ऍडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या दोन जुळ्या भावंडांनी. हा चित्रपट उनायटेड स्टेट्स (united states) मध्ये फ्लॉप ठरला परंतु साऊथ एशिया आणि भारतात हा चित्रपट भरपूर चालला. हा चित्रपट आपण अजूनही तेवढ्याच उत्सुकतेने बघतो जेवढ्या उत्सुकतेने आपण लहानपणी कधी बघितला असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *