आपल्याला आपल्या भारत देशाची साधारणतः ३ ते ४ नावे माहीत असतील. जसा आपला भारत देश विविध अंगी, विविधरंगी, विविध धंगी आणि विविध भाषि आहे तसाच तो विविध नावी देखील आहे. जशी की भारत, India, Hindustan इत्यादी. पण याही पेक्षा भारताची कितीतरी नावे आहेत की जी आपल्याला माहीत पण नसतील. भारताची इतर नावे खालीलप्रमाणे,
भारत :- असे म्हणतात की भारत हे नाव द्युष्यांताचा मुलगा किंवा ऋषभाचा मुलगा भरत यांच्या नावावरून ठेवले आहे. भारत नावाचा उल्लेख आपल्याला फक्त भारतीय भाषांमध्ये च दिसून येतो.
भारतवर्ष :- भारतवर्ष या शब्दाचा उल्लेख प्रथम विष्णू पुराणात आपल्याला आढळून येतो. येथे भरताला भारताचा राजा असा संदर्भ देण्यात आला आहे.
India :- भारताला India हे नाव सिंधू नदीवरून पडले. ग्रीकांच्या काळापासूनच India हा शब्द वापरला जात होता. भारतीय भाषांखेरीज ईतर बाहेरील भाषांमध्ये India हा शब्द वापरत आहे. INDIA या शब्दाच्या अधिकृत असा काही फुल्ल फॉर्म नाही. पण, काहींच्या मते पुढील अर्थ जोडता येतो,
I- Independent म्हणजे स्वतंत्र ,
N- National म्हणजे राष्ट्रीय,
D-Democratic म्हणजे लोकशाही,
I- Intelligent म्हणजे हुशार/बुद्धिमान,
A-Area म्हणजे जागा.
हिंदुस्थान :- हिंदू लोकांचा देश म्हणून हिंदुस्थान हे नाव उदयाला आले. हिंद हा शब्द संस्कृतमधील किंवा इंडो आर्यन यापैकी सिंधू (Indus river) यावरून घेतलेला आहे.
अल – हिंद (Al-Hind):- काही अरेबिक भाषेतील मजकूर मध्ये भारताचा उल्लेख अल- हिंद असा केलेला आहे. अल-हिंद याचा शाब्दिक अर्थ “हिंद” असा आहे.
जांबुद्वीप :- संस्कृत मध्ये जम्बुद्वीप असा शब्द आहे. याचा अर्थ “ जांबूच्या झाडांची म्हणजेच जांभळांच्या झाडांची जमीन”. जांबुद्वीप हा प्राचीन शब्द आहे. भारत हा शब्द वापरात येण्याच्या आधीपासून जांबुद्वीप हा शब्द ग्रंथांमध्ये वापरला जायचा.
तियांझू (Tianzhu):- तियांझू हा एक चायनीज शब्द आहे. हे एक भारताचे ऐतिहासिक पूर्व आशियाई नाव आहे, जे चिनी लीप्यंतरणातून पर्शियन हिंदूंचे नाव संस्कृत सिंधू म्हणजे सिंधू नदी असे नाव घेतलेले आहे. तीयांझु या शब्दाचा उल्लेख होऊ हंशू (Hou Hanshu) यांच्या “Book of the latter Han” या पुस्तकात आढळून येतो.
होडू (Hodu):- होडू हा एक हिब्रू शब्द आहे. या शब्दाचा उल्लेख एस्तेरच्या पुस्तकात केला गेला आहे. होडू हा शब्द देखील संस्कृत शब्द सिंधू या वरून घेतला आहे.
आर्यावर्त/द्रविडा :- आर्यावर्त आणि द्रविडा या शब्दांचा उल्लेख आपल्या संस्कृतात आढळतो. आर्यावर्त म्हणजे उत्तर भारताचा भाग आणि द्रविडा म्हणजे दक्षिण भारत होय.
नाभिवर्ष :- हिंदू मान्यतेनुसार नाभि म्हणजे “ ब्रह्मदेवाची नाभि” आणि वर्ष म्हणजे देश. जैन मजकुरात भरताच उल्लेख नाभिवर्ष असा केला आहे. नाभि हा चक्रवर्ती राजा होता आणि पहिले जैन तीर्थंकर रिषभनाथ यांचे वडील होते.
तेंजिकू (Tenjiku):- तेंजिकू हा एक जापनीज शब्द आहे. प्राचीन काळी जपानी, आशियाई आणि विशेषतः धर्माभिमानी बौध्द, भारतीय उपखंडातील बौध्द, धर्माच्या पवित्र उत्त्पत्तीचा संदर्भ स्पष्ट करताना तेंजिकु अशा संज्ञेचा वापर करत.
इंडिका (Indica):- प्राचीन ग्रीक इतिहासकार आणि भारतीय वंशाचे लेखक मेगास्थनीस यांनी त्यांच्या पुस्तकात भारत देशाचा उल्लेख इंडिका असा केला आहे.
चेइंचुक ( Cheonchuk):- कोरियन भाषेत भारताला चेइंचुक असे नाव आहे.
शेंदू (Shendu):- सिमा कियान यांच्या शिजी “the scribe records” या पुस्तकात भारताचा उल्लेख शेंदु असा केला गेलेला आहे. कदाचित “सिंधू” या शब्दावरून च शेंदू या शब्दाची निर्मिती झाली असावी. सिमा कियान या एक चायनीज इतिहासकार होत्या.