मधुबालाला का जावे लागले होते जेलमध्ये

मधुबाला
मधुबाला

सध्या सोशल मीडियावर विमल जाहिरातीची जोरदार चर्चा चालू आहे. त्यावर लोकांच्या खूप सार्‍या प्रतिक्रिया येत आहेत या ॲक्टर ने असं केले पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे, त्याने हे करायला नको पाहीजे अशा खूप अशा गोष्टी या बॉलिवूडमध्ये होत असतात. काही गोष्टींमुळे मतभेद निर्माण होतात. असे एक ना अनेक प्रसंग बॉलिवूडमध्ये घडत असतात त्याचा परिणाम कोणाला बोल लावले जाते, तर कोणावर केसेस होतात तर कोणाला जेलमध्ये जावं लागतं तर कोणाकोणाचे बॉलिवूडमधील करिअर देखील समाप्त होते. आज अशाच एका प्रसंगाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे एका हीरोइन ला जेलमध्ये जावे लागले होते.

मधुबाला
मधुबाला

मधुबालाला का जावे लागले होते जेल मध्ये ?

ही हीरोइन दुसरी तिसरी कोणी नसून ७० ते ९० च्या दशकातील सुंदर मनमोहक अशी अदाकारा मधुबाला ही होती. तर तो प्रसंग असा होता की ‘ नया दौर ‘ या १९५७ च्या चित्रपटासाठी स्त्री नायक म्हणून मधुबाला ला घेण्यात आले होते. नया दौर या चित्रपटाचे दिग्दर्शन बी. आर. चोप्रा यांनी केले होते आणि दिलीप कुमार नायकाच्या आणि मधुबाला नायिकेच्या भूमिकेत दिसणार होते. यासाठी मधुबालाने अडवान्स पैसे देखील घेतले होते. परंतु दिग्दर्शक बी. आर. चोप्रा आणि मधुबाला यांच्यात काही कारणाने वाद निर्माण झाले. हे वाद एवढे टोकाला गेले की परिणामी बी. आर. चोप्रा यांनी मधुबाला ऐवजी वैजयंतीमाला ला नायिकेच्या भूमिकेत घेण्याचे ठरविले. आणि मधुबाला हिच्यावर खटला दाखल केला. या खटल्यामध्ये मधुबाला ला काही काळ तुरुंगवास भोगावा लागला.

नया दौर (१९५७)
नया दौर (१९५७)

चित्रपट पूर्ण होईपर्यंत मधुबाला वर हा खटला तसाच चालू होता मग चित्रपट पूर्ण झाल्यावर बी.आर. चोप्रा यांनी तो खटला मागे घेतला. नया दौर हा चित्रपट त्या वेळेला खूप गाजला आणि या चित्रपटाला भरपूर अवॉर्ड्स देखील मिळाले. या खटल्याचा मधुबाला वर फारसा परिणाम झाला नाही. याचदरम्यान म्हणजेच १९५६ च्या वेळी मधुबाला ही ‘ राज हाथ ‘ आणि ‘ शिरीन फरहाद ‘ या दोन चित्रपटांमध्ये दिसली आणि हे दोन्हीही चित्रपट यशस्वी ठरले आणि भरघोस कमाई केली.

१९५६ नंतर मधुबालाने ‘ चलती का नाम गाडी ‘ , ‘ हाफ तिकीट ‘, ‘ हावडा ब्रिज ‘ असे अनेक हिट चित्रपट केले. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे १९६० सालचा ‘ मुघल-ए-आझम ‘. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आणि अजूनही या चित्रपटाची जादू तेवढीच आहे जेवढी १९६० साली होती. त्या काळात या चित्रपटाने ५.५ करोड इतकी कमी केली.

मुघल-ए-आझम

मधुबाला चा शेवटचा चित्रपट ‘ शराबी ‘ हा १९६४ ला रिलीज झालेला जो मधुबालाच्या ही आयुष्यातला शेवटचा रिलीज झालेला चित्रपट बनला. २३ फेब्रुवारी १९६९ ला मधुबाला चा हृदयाचा झटका आल्याने मृत्यू झाला.

मधुबाला जेवढी सुंदर, मनमोहक होती तेवढेच तिचे आयुष्य गंभीर आजारांनी ग्रासलेले होते. जेव्हा ती गेली तेव्हा ती केवळ ३७ वर्षांची होती. मधुबाला ला जन्मजात व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट हा हृदयाचा दोष होता. फिल्म फेअर ( FilmFare) ने तिला ‘ सिंड्रेला – जिच्या घड्याळात खूप लवकर बारा वाजले ‘ अशी उपाधी देऊन तिला स्मरण केले. मधुबाला चे जाणे हे सगळ्यांसाठीच अनपेक्षित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *