“सच कह रहा है दीवाना… दिल, दिल ना किसीसे लगाना “
हे गाणं कुठल्या चित्रपटातले आहे हे सांगायची गरज नाहीये. ओळखलच असेल या चित्रपटाचे नाव…. हा बरोबर “रहना है तेरे दिल में” (RHTDM). हे गाणं आणि या चित्रपटातील सगळी गाणी अजूनही आपण गुणगुणतो. आपल्या गोड आणि खेळकर अशा स्वभावाच्या मॅडीने आणि मनमोहक अशा दिया मिर्झा ची अदाकारी यामुळे हा चित्रपट अजूनही पहावासा वाटतो. हा चित्रपट १९ ऑक्टोबर २००१ ला प्रदर्शित झाला. म्हणजेच या चित्रपटाला जवळ जवळ २० वर्ष होऊन गेली तरीही या चित्रपटाचे चाहते हा चित्रपट तितक्याच तळमळतेने अजूनही बघतात. हा चित्रपट दिग्दर्शित केला होता गौतम मेनन यांनी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते मॅडी उर्फ माधवन शास्त्री आणि दिया मिर्झा. त्याचबरोबर सैफ अली खान ही होता. हा चित्रपट तमिळ चित्रपट मिंनाले (Minnale) यावर आधारित होता.
RHTDM हा चित्रपट जेव्हा रिलिज झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिस वर जास्त चालला नाही. फ्लॉप ठरला. पण तरीही प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाने वेगळीच जागा निर्माण करून ठेवली आहे.
या चित्रपटातील एक खास बात आम्ही सांगणार आहोत. ती म्हणजे या चित्रपटात मॅडी रीना ला म्हणजे दिया मिर्झा ला त्याच्या “मुंबईतील Favorite” ठिकाणी घेऊन जातो. आठवली असेलच ती जागा, तो सीन…. मंत्रमुगध करणारा तो समुद्र…. “मुंबई मैं यह मेरी सबसे फेवरेट जगह है….” असे मॅडी म्हणतो.
खर म्हणजे ही “फेवरेट जगह” मुंबई मध्ये नाहीचे…. ती आहे साऊथ आफ्रिकेत. हो साऊथ आफ्रिकेतील जोहन्सबर्ग येथे. या चित्रपटाच्या आणि मॅडी च्या एका चाहत्याने मॅडी ला ट्विट केले होते की ‘ या चित्रपटाला १९ वर्ष होऊन गेली आणि अजूनही मी ती मुंबईतील फेवरेट जागा शोधतो आहे, ती कुठे आहे कृपया सांगा.’ यावर मॅडी ने ही त्याच्या ट्विटर अकाऊंट वरून रिप्लाय दिला की ही जागा मुंबईत नसून साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील आहे.
पण खरे पाहता जोहान्सबर्ग मध्ये एकही समुद्र किनारा वैगरे नाही आहे. जोहान्सबर्ग हे साऊथ आफ्रिकेतील फॉक्स नदीच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले शहर आहे.
मग या चित्रपटातील तो सीन खरा आहे साऊथ आफ्रिकेतील डर्बन बीच वरील आहे.
मॅडी ला ही गोष्ट नंतर लक्षात आल्यावर त्याने त्याची चूक मान्य केली आणि रहना है तेरे दिल मैं चित्रपटातील तो सीन जोहान्सबर्ग मधला नसून डर्बन बीच वरील आहे हे आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे सांगितले.