“आज काल मोबाईल फोन ही एक गरज नसून व्यसन बनलेले आहे.”
आठवतोय का हा डायलॉग मुंबई पुणे मुंबई मधला. आणि ते तितकेच खरेही झाले आहे. कारण बघां झोपेतून उठलो की मोबाईल, झोपायला गेलो की मोबाईल, जेवताना मोबाईल, बिझी आलो तरी मोबाईलमध्ये आणि टाइमपास करत असलो तरी मोबाईलमध्ये. सारखा हातात आपल्या मोबाईल. कारण याच मोबाईल मध्ये आपल्या महत्वाच्या गोष्टी असतात. आपले महत्वाचे डॉक्युमेंट्स, आपले फोटो किंवा अजून काही महत्वाच्या गोष्टी. सर्वकाही यातच दडलेले असते. एवढे सगळे महत्वाचे काय काय आपल्यामध्ये सामावून घेणाऱ्या मोबाईल ला देखील मग सेक्युरिटी (security) ची गरज लागते.
मग आपण आपल्या मोबाईलचे सौरक्षण कसे करणार तर मग येते “ मोबाईल स्क्रीन लॉक “ (Mobile screen lock) याद्वारे.
मोबाईल स्क्रीन लॉक हे जर आपण आपल्या फोन ला लागू (apply) केले की आपला फोन फक्त आपणच चालू करू शकतो. जोपर्यंत दुसऱ्यांना त्याचे लॉक समजत नाही तोपर्यंत. तर मोबाईल स्क्रीन लॉक करायचा कसा ? तर त्याच्या ४ पद्धती आहेत.
- पॅटर्न लॉक (pattern lock)
- पिन लॉक (pin lock)
- पासवर्ड लॉक (password lock)
- फिंगर प्रिंट लॉक (fingerprint lock)
पॅटर्न लॉक :- या प्रकारच्या लॉक मध्ये तुम्हाला ठिपके जोडून तुमचा पॅटर्न तयार करायचा असतो. यात तुम्हाला कमीत कमी ४ ठिपके जोडायचे असतात. मग तो सोपा ठेवायचा कि दुसऱ्याला गोंधळात टाकणारा असावा हे तुमच्यावर अवलंबून.
पिन लॉक :- पिन लॉक म्हणजे तुम्हाला स्वतःचा माहीत असलेला नंबर. पिन लॉक मध्ये तुम्हाला आकड्यांचा म्हणजेच नंबरचा वापर करावा लागतो. हा लॉक त्तुम्ही ४ किंवा त्यापेक्षा अधिक आकडे म्हणजे नंबर्स वापरून ठेवू शकता.
पासवर्ड लॉक :- पासवर्ड लॉक मध्ये तुम्ही आकड्यांसोबतच (number), अक्षरांचा (letters) देखील वापर करू शकता. पासवर्ड लॉक ठेवताना तुम्ही तो ४ पेक्षा अधिक नंबर्स किंवा अक्षर यांचा उपयोग करून ठेवू शकता. पासवर्ड लॉक हा पॅटर्न लॉक आणि पिन लॉक या दोन्ही लॉक पेक्षा जास्त सुरक्षित मानला जातो.
फिंगर-प्रिंट लॉक :- सोफ्टवेअर ची जशी प्रगत आवृत्ती (version) येते तसेच फिंगर प्रिंट लॉक हे लॉक्स मधील प्रगत आवृत्ती (advanced version) आहे. या लॉक मध्ये कुठल्याही प्रकारचे नंबर्स किंवा अक्षर वापरायची नसतात. यात तुम्ही तुमच्या बोटाचा ठसा उमटवून लॉक ठेवू शकता. फिंगर-प्रिंट लॉक तुम्ही एकदा तुमच्या मोबाईल ला लागू (apply) केले की तुमचा फोन फक्त तुमच्या बोटाच्या ठाष्यानेच उघडू शकत.
तर मग आता तुम्ही ठरवा तुमच्या मोबाइल ला कुठला लॉक ठेवायचा.