साक्षी मर्डर केस चा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. साहिल ने क्रूरपणा च्या सगळ्या मर्यादा ओलांडून अतिशय निर्घृण पणे १६ वर्षाच्या साक्षी ची हत्या केली आहे. यात त्याने तिला मारण्यासाठी सुरा देखील विकत घेतला होता. याच सुऱ्याने ४० वेळा तिच्यावर वार केला. कित्येक वेळा तो सुरा तिच्या शरीरात अडकला देखील, तुटला देखील पण तरीही तो वार करतच राहिला. एवढेच नाही तर दगडाने ठेचून ठेचून तिला मारले. ती मेलेली आहे हे कळून देखील त्याने मोठ्या दगडाने तिच्यावर वार करतच राहिला.
हे सगळ ऐकून, व्हायरल झालेला व्हिडिओ बघून आपण खूप हळहळ व्यक्त करतो. आपल्याला खूप राग देखिल व्यक्त करतो. आपल्याला खूप राग येतो की कसे असे कोणी करू शकते.
या व्हिडिओ मध्ये आपण बघू शकतो की ही सगळी घटना घडत असताना तिथून कितीतरी लोकं येत जात होती. घडत असलेला प्रकार बघत होती. पण एकानेही त्याला विरोध करण्याचे त्या साहिल ला अडवण्याचे धाडस केले नाही. जर पहिलाच वार होत असताना जर तिथल्या लोकांनी त्याला अडवले असते धरले असते तर कदाचित साक्षी जिवंत असती.
ही अशी “ लव्ह जिहाद “ ची पहिलीच किंवा ऐकण्यात न येणाऱ्या गोष्टी नाही आहेत. हफ्त्यातून एक तरी लव्ह जिहाद ची अशी घटना घडत असते. यात आपण मुलींना सांगतो की सावध रहा लव्ह जिहाद सारख्या गोष्टी पासून लांब रहा. पण यात लोकांनीही आपली बघ्याची भूमिका सोडून विरोधकांची भूमिका घेतली पाहिजे. आणि जिथे असे काही घडताना दिले तर त्याला आळा घातला पाहिजे. यासाठी तरी निदान लोकांनी एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे.
लव्ह जिहाद चा शिकार बनलेल्या मुली फक्त हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच नाही आहेत. तर त्यांची संख्या खूप जास्त आहे. नंतर मेणबत्ती घेऊन फिरण्यापेक्षा जिथल्या तिथे अशा घटनांचा विरोध केला पाहिजे. आणि आपली बघ्याची भुमिका बदलून विरोधकाची भूमिका घेतली पाहिजे. तरच थोडीफार लोकांची भीती अशा साहिल नावाच्या प्राण्यांना होईल. कायद्याचा धाक सामान्य जनतेला सोडून गुन्हेगारांना तर मुळीच नसतो. त्यामूळे आता सामान्य जनतेनेच आपला धाक गुन्हेगारांना दाखवला पाहिजे.