आजकाल च्या काळात सगळे ज्ञान आपल्याला घरी बसल्या बसल्या मिळते. पूर्वी वर्तमानपत्राद्वारे (newspaper) जगातली माहिती मिळायची, पण आता आपल्याला जगातली कुठलीही माहिती आपल्या संगणकाद्वारे (computer) मिळते. आपल्याला कुठलीही माहिती हवी असेल तर आपण गूगल (google) वर शोधतो. मग ती माहिती संदर्भातील संकेतस्थळे (website) आपल्याला दिसतात. पण सर्वात जास्त बघितली जाणारे संकेतस्थळ आहे विकिपीडिया (Wikipedia).
विकिपीडिया हे एक संकेतस्थळ म्हणजेच website असून ती जगभरातील सगळ्या भाषांमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकते. विकिपीडिया हि आपल्याला ३२३ भाषांमध्ये उपलब्ध आहे. १५ जानेवारी २००१ मध्ये जिमी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी विकिपीडिया ची सुरुवात केली. सर्वात पहिले विकिपीडिया हे इंग्रजी भाषेमध्ये सुरू झाले. विकिपीडिया मधील माहिती आपण वाचुही शकतो आणि एडिट म्हणजे त्यात बदलही करू शकतो. हळू हळू याची लोकांना प्रचिती येऊ लागली तस-तसे विकिपीडिया हे ईतर भाषांमध्येही उपलब्ध होऊ लागले.
Wikimedia Foundation ही एक ना नफा ना तोटा ( non profit organization) या तत्त्वावर चालणारी संस्था आहे. ही संस्था विकिपीडिया च्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम करते.
विकिपीडिया चे सध्या ३,०७,४३६ पेक्षा जास्त संपादक आहेत आणि ९६,७८९,७८२ इतके नोंदणीकृत युजर्स आहेत. आजपर्यंत ३ ते साडेतीन कोटींहून अधिक लेख विकिपीडिया वर विविध भाषांमध्ये लिहिले गेलेले आहेत. त्यापैकी जवळ जवळ ८०,००० लेख मराठी विकिपीडिया वर उपलब्ध आहेत.
विकिपीडिया हे असे एकमेव संकेतस्थळ आहे की जे तुम्ही तुमच्या माहितीसाठी वापरुही शकता आणि त्यात बदलही करू शकता. Wikipedia हे तुम्हाला कोणत्याही विषयावर लिहायला मुभा देते. साधारणतः येथील सगळेच लेख माहितीपूर्ण आणि संदर्भासहित असतात. परंतु सगळ्याच लेखांचे समसमिक्षण (symmetry) झालेलेच असतील असे नाही.
आपण म्हणजे जे कोणी Wikipedia वर नोंदणीकृत लेखक किंवा एडिटर असतील ते Wikipedia च्या लेखामध्ये आवश्यकतेनुसार बदल करू शकतो हे खरे असले तरी ते बदल किती असावे किंवा नाही यालाही मर्यादा आहेत. एखाद्या लेखामध्ये जर पूर्वी बदल झाले असतील तर ते आपण त्या लेखाचा इतिहास या मध्ये पाहू शकतो. आणि हे बदल कोणी केले आणि केव्हा केले हेही आपल्याला त्या लेखाच्य इतिहासामध्ये बघू शकतो.
विकिपीडिया हा एक मुक्त असा माहितीचा स्त्रोत आहे. याच्यावरची माहिती वाचण्यास किंवा वापरण्यास कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. हे एक असे संकेतस्थळ आहे की ज्याच्यावरील वाचकांनीच एकत्रितपणे संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे. विकिपीडिया वरील लेख हे अभ्यासासाठी १००% खात्रीलायक असतीलच असे नाही. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते आपण सहज पाहू शकतो, अभ्यासू शकतो.