‘ अमरेंद्र बाहुबली यानी मैं….’ हा डायलॉग वाचून पूर्ण चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला असेल. बाहुबली हा चित्रपट मुळतः तेलुगू भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रभासची अक्टिंग आणि त्याला शोभेसा असा हिंदी डब्ब केलेला भारदस्त आवाज यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले असे म्हणायला हरकत नाही. प्रभासला दिलेला हा हिंदीतील आवाज कोणाचा आहे हे वेगळे सांगाiयची गरज नाही. अगदी बरोबर शरद केळकर याने. शरद केळकर चा आवाज या चित्रपटात बाहुबलीला म्हणजेच प्रभसला अगदी तंतोतंत जुळून आला.
शरद केळकर ने आवाज दिलेला बाहुबली हा एकच चित्रपट आहे का ?
तर नाही. बाहुबली हा शरद केळकरचा पहिला किंवा एकमेव असा हिंदी मध्ये डब्ब केलेला चित्रपट नाहीये. तर त्याने बॉलिवूड, टोलीवूड आणि हॉलिवूड मधील चित्रपटांना देखील आपला आवाज देऊन हिंदी मध्ये डब्ब केले आहेत.
Dawn of the planet of the apes या चित्रपटात Jason Clarke याला तर Guardians of the Galaxy आणि Captain Marvel या चित्रपटात Lee pace याला आपला आवाज दिलाय. Furious 7, The fate of the furious आणि Hobbs and Shaw यात Jason Statham साठी आवाज दिला आहे. Exodus: gods and kings मध्ये जोएल Edgerton, Mad max: furry road मध्ये टॉम हार्डी, X-men Apocalypse मध्ये Oscar Isaac यांना हिंदी डब्ब साठी शरद केळकर चा आवाज दिला आहे. एवढेच नाही तर आपला Xxx म्हणजेच Vin Diesel याला Xxx: Return of Xander cage या हिंदी डब्ब चित्रपटात शरद केळकर ने आवाज दिला आहे.
कधी कधी आपल्याला वाटते की हे हिंदी डब्ब केलेल्या चित्रपटांत त्याच अभिनेत्यांचे हिंदीतील आवाज असतात पण असे नसते तर ते इतर कोणाकडून तरी त्यांच्या साजेशा आवाजात अभिनेत्यांचे डायलॉग बोलून घेतले जातात. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बाहुबली साठी शरद केळकर ने आपला आवाज दिलाय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण ‘ गद्दलकोंडा गणेश ‘ या तेलुगू चित्रपटातील वरुण तेज या अभिनेत्याचे हिंदी डब्ब डायलॉग शरद केळकर याने केले आहे हे कुठे माहीत होते.
एवढेच नाही तर ‘ द लेजंड ऑफ हनुमान ‘ यातही रावण या पात्रासाठी शरद केळकर चा आवाज घेतला आहे.
हे असे डब्ब केलेले चित्रपट फक्त हिंदीतच होतात असे नाही तर हिंदीतून इतर भाषांमध्येही होतात. सध्याच्या चालणाऱ्या ‘ राष्ट्रभाषा ‘ वादामध्ये असे डब्ब केले चित्रपट सगळेचजण पाहतात पण तिथे कोणी विचार करत नाही की ही कुठली भाषा आहे. आपण आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये चित्रपट पाहायला उत्सुक असतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा मान आहे आणि तो असतोच मग ती कुठलाही भाषा असो.