सध्या अल्लू अर्जुन चा “पुष्पा – द राईज” सगळीकडे खूप जबरदस्त चालत आहे. तो चित्रपटच काय तर त्या चित्रपटाच्या गाण्यांनी देखील सगळ्यांना वेड लावले आहे मग ते ‘ सामी सामी ‘ असो वा ‘ उ अंटवा ‘ असो वा ‘ स्रीवल्ली ‘. या चित्रपटातील गाणी, डान्स करण्याची स्टाईल, डायलॉग किंवा पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनची हनुवटी वरून हाथ फिरविण्याचा स्टाईल देखील लोकांनी कॉपी केली. ‘ स्रीवल्ली ‘ हे गाणे तर इतके गाजले की त्याचे मराठी रिमेक देखील लोकांनी बनवले. या गाण्याच्या डान्स ची स्टेप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर सगळ्यांनी ट्राय केली इतकचं नव्हे तर कोणी कोणी कोंबडीला देखील या गाण्याच्या स्टेप्स करतानाचे व्हिडिओ केलेत. ते असो.
हे स्रीवल्ली गाणं म्हणताना पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन डान्स च्या स्टेप्स करताना दिसतो. तेव्हा आपल्याला असे दिसते की तो एका पठारावर डान्स करतोय आणि मागे आपल्याला एक डोंगर दिसतो. त्या डोंगरावर एक मंदिर दिसते.
हे मंदिर माहीत आहे का कुठे आहे ?
तर हे आहे थिरुमलाई कोविल मुरुगन मंदिर. हे मंदिर दक्षिण भारतातील तामिळनाडू मधील टेंकासी जिल्ह्यातील पानपोली, सेंगोटाई येथील मुरुगन मंदिर आहे. हे मंदिर केरळ ची राजधानी तिरुअनंपुरम पासून १०० किमी अंतरावर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. ही मंदिराची टेकडी आजूबाजूच्या नारळाच्या बागांनी आणि अनेक लहान लहान गावांनी वेढलेली आहे. या मंदिरात जाण्यासाठी भक्तांना ६२४ पायऱ्या चढून जावे लागते. तसेच आता बदलत्या काळानुसार इथे गाड्या जाण्यासाठी मंदिरापर्यंत रोड बनवले आहेत.
या मंदिरात रोज मुरुगन देवाची आठ वेळा पूजा केली जाते. येथील मुरुगन देवाला ‘तिरुमलाई कुमारस्वामी’ किंवा ‘तिरुमलाई मुरुगन‘ असेही म्हणतात. मंदिरातील मूर्ती ही चार हाथ उभ्या असलेल्या स्थितीत दिसते. मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या मुख्य गर्भ गृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती आहे.
टेकडीवर एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर वल्लभ विनायकाचे मंदिर आहे. या टेकडीच्या शिखरावर एक तलाव देखील आहे. तिथे या तलावाच्या पाण्याला पवित्र मानले जाते. या तलावातील झऱ्याला अष्ट पद्मकुलम असे म्हणतात. अगस्तियार ऋषींच्या सामर्थ्याने ते तयार झाले आहे अशी आख्यायिका आहे.