द केरला स्टोरी ( The Kerala story ) अदा शर्माचा नवीन चित्रपट. नाव वाचूनच काहीतरी गुढ लपल्याची जाणीव आपल्याला होते. द केरला स्टोरी हा केरळ मध्ये घडलेल्या पण कधीही याची कुठेही वाच्याता न झालेल्या सत्य घटनांवर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाची गोष्ट अशी आहे की केरळ मध्ये राहणारी शालिनी उन्नीकृष्णन हिची. शालिनी हिला नर्स बनायचे होते. नर्स बनून लोकांची सेवा करायची तिची इच्छा होती. परंतु परिस्थितीला काही वेगळेच करायचे होते. शालिनी च्या नर्स ची ट्रेनिंग चालू असताना तिच्यासोबत अशा काही घटना घडतात की ती कधी शालिनी उन्नीकृष्णन ची फातिमा बी बनते हे तिलाच कळत नाही. हिजाब, जिहाद, मजहब म्हणजेच धर्म या सगळ्याचा ती कधी स्वीकार करते की कोणी करायला भाग पडते आणि Islamic State of Iraq and Syria (ISIS) मध्ये शामिल होण्यास जबरदस्ती केली जाते.
द केरला स्टोरी ही केवळ शालिनी उन्नीकृष्णन हीचीच नाही आहे तर अशा कितीतरी मुलींच्या आहेत ज्या काहीना काही कारणावरून इस्लामिक धर्म स्वीकारतात आणि ISIS मध्ये शामिल होण्यास जबरदस्ती करतात. आणि ISIS मध्ये शामील केलेल्यांचा आकडा हा चित्रपटामध्ये ३२,००० सांगण्यात आलेला आहे. परंतु Observe Research Foundation (ORF) च्या २०१९ च्या अहवालानुसर २०१४ ते २०१८ दरम्यान केवळ ६० ते ७० व्यक्ती केरळमधून ISIS मध्ये शमील झाल्या होत्या. परंतु भारत सरकारच्या आकडेवारीनुसार एकूण १०० ते २०० व्यक्ती या संघटनेत शामिल झाल्या होत्या.
चित्रपटाच्या याच सत्य असत्य जी काय गोष्ट आहे त्यावरून विवाद सुरू आहेत. या चित्रपटाच्या रिलिज साठी खूप जणांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेस चे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी देखील आपल्या ट्विटर वरून या चित्रपटाला नाराजी दर्शविली आहे. ट्विट करत ते असे म्हणाले की, ‘ ही तुमच्या केरळ ची गोष्ट असेल, आमच्या केरळ ची नाही.’ (It may be ‘your’ Kerala story. It is not ‘our’ Kerala story)
शिवाय केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. यावर ते म्हणाले की राज्याविषयी जाणूनबुजून द्वेष पसरविण्याच्या हेतूने हा चित्रपट बनवला आहे.
एवढेच नाही तर मुस्लीम युथ लीगच्या केरळ राज्य समितीने चित्रपटातील आरोप सिद्ध करणार्यास ₹ १ कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे आणि असेही म्हटले आहे की पुरावे प्रदान करण्यासाठी संकलन केंद्रे ४ मे रोजी प्रत्येक जिल्ह्यात उघडली जातील, एएनआयने वृत्त दिले आहे. रिलीजची तारीख जशी जवळ येत आहे, तसा या चित्रपटावरून वाद वाढत आहेत. अदा शर्मा अभिनीत या चित्रपटाने ट्रेलरमध्ये दावा केला आहे की केरळमधील 32,000 महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील झाल्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वाद निर्माण झाला.
द केरला स्टोरी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे सुदिप्तो सेन यांनी. आणि बनवला आहे विपुल अमृतलाल शाह यांनी. या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रिलीज होणार आहे ५ मे ला. चित्रपट रिलीज होण्या आधीच इतके वाद होत आहेत तर चित्रपट रिलीज झाल्या नंतर काय होईल