सध्या ऑलिम्पिक (Olympic) चे दिवस चालु आहेत, त्यामुळे रोज आपण वर्तमान पत्रात किंवा टीव्ही वर ऑलिम्पिक च्या बातम्या बघतो, वाचतो की आज हा खेळ झाला, या खेळात हा खेळाडू जिंकला, या खेळाडूला सुवर्ण पदक मिळाले वैगरे वैगरे. पण हा ऑलिम्पिक (Olympic) केव्हा सुरू झालाय हे माहीत आहे का? तर पहिल्यांदा ऑलिम्पिक (Olympic) ची सुरूवात झाली १८९६ मध्ये. बॅरन पियरे डी कुबर्टीन (Baron Pierre De Coubertin) यांनी १८९४ मध्ये International Olympic Committee म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना केली. त्यामुळे १८९६ मध्ये पहिले आधुनिक खेळ अथेन्स (Athens) मध्ये सुरू झाले. ऑलिम्पिक ही जगातील आघाडीची क्रीडा स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिक हे एका विशिष्ट खेळासाठी नाही, तर तिथे होणाऱ्या विविध खेळांसाठी प्रसिध्द आहे. या स्पर्धेत २०० हून अधिक देश सहभागी होतात. ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी खेळतात, उन्हाळी आणि हिवाळी असे दर दोन वर्षांनी चार वर्षाच्या कालावधीत ऑलिम्पिक खेळ खेळले जातात.
ऑलिम्पिक मध्ये १० ते १२ खेळ नसून जवळ जवळ ३५ ते ३६ खेळ खेळले जातात. धनुर्विद्या (Archery), कलात्मक पोहणे (Artistic swimming), व्यायामाचे खेळ ( Athletics), बॅडमिंटन (Badminton), बेसबॉल (Baseball) , बास्केटबॉल (Basketball), बॉक्सिंग (Boxing), कॅनोईंग (Canoeing), सायकलींग (Cycling), डायविंग (Diving), इक्विस्त्रेन (Equestrian), फिल्ड हॉकी (Field hockey), फेन्सिंग (Fencing), फुटबॉल (football), जिमनॅस्टिक (Gymnastics), गोल्फ (Golf), ज्युडो (Judo), कराटे (karate), हँडबॉल (Handball), मॉडर्न पेंटाथलॉन (Modern pentathlon), रोईंग (Rowing), रग्बी सेव्हन्स (Rugby Sevens), नौकाविहार (Sailing), शूटिंग (Shooting), स्केट बोर्डिंग (Skateboarding), सॉफ्टबॉल (Softball), सर्फिंग (surfing) , स्विमिंग (Swimming), टेबल टेनिस (Table Tennis), तायक्वांदो (Taekwondo), टेनिस (Tennis), ट्रायथलॉन(Triathlon), व्हॉलीबॉल (Volleyball), वॉटर पोलो (Water polo), वजन उचल (Weightlifting), कुस्ती (Wrestling), असे विविध खेळांच्या स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये होतात.
ऑलिम्पिक मध्ये जिंकणाऱ्या खेळाडूला सुवर्ण (Gold), रजक (Silver), कांस्य (Bronze) असे अनुक्रमे पहिला (1st) , दुसरा (2nd) , आणि तिसरा (3rd) असे पदक (medal) दिले जातात. ऑलिम्पिक मधली ही तिन्ही मेडल्स ६० मिमी आणि जाडीला ३ मिमी ची असतात. सुवर्ण पदक म्हणजे Gold Medal हे ९२.५% चांदी आणि ६ ग्रॅम गोल्ड प्लेटेड असते. रजक पदक म्हणजे Silver Medal हे ९२.५% चांदीने बनलेले असते. आणि कांस्य पदक म्हणजेच Bronze Medal हे ९२.५% कॉपर, ०.५% टिन आणि २.५% झिंक यांनी बनलेले असते.
आतापर्यंत भारताने ऑलिम्पिक मध्ये ९ सुवर्ण (Gold), ८ रजक (Silver), आणि १२ कांस्य (Bronze) अशी एकूण २९ पदक मिळवले आहेत. ऑलिम्पिक मध्ये २५३१ अशी सर्वात जास्त पदक (Medals) मिळवले आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States of America) याने.
ऑलिम्पिक खेळाची जशी लोकांना उत्सुकता लागते तसेच ऑलिम्पिक खेळाचे चिन्ह (Symbol) हे देखील लोकांना आकर्षित करण्यासारखेच आहे. ऑलिम्पिक चिन्ह हे ५ एकमेकांमध्ये अडकलेल्या वर्तुळांनी बनलेले आहे. हे पाच वर्तुळ पाच रंगांमध्ये असतात. पांढऱ्या रंगावर निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल अशी पाच रंगांची वर्तुळे याला “ऑलिम्पिक रींग्ज” (Olympic Rings) असे म्हणतात. ऑलिम्पिक चे हे चिन्ह १९१३ साली कुबर्टीन यांनी तयार केले होते. ऑलिम्पिक चिन्हातील हे पाच वर्तुळ युरोप, आफ्रिका, आशिया, अमेरिका आणि इंडोनेशिया या पाच खंडांचे प्रतिनिधित्व करतात.