रोजच्या वापरातील मोबाईल सेटीन्ग्स

रोजच्या वापरातील मोबाईल सेटीन्ग्स

आज आपण आपल्या “रोजच्या वापरातील मोबाईल फोन च्या सेटीन्ग्स” या विषयावर बोलणार आहोत. मोबाईल फोनच्या सेटीन्ग्स (settings) बद्दल तर सगळ्यांनाच माहित असते असे नाही. कधी कधी आपल्या घरातील मोठ्याना, तर कधी आपल्याला सुद्धा आपल्या फोन मध्ये हे असे सगळे फिचर्स आहेत हे सुद्धा माहीत नसते. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मोबाईलच्या फिचर्स ची माहिती घेऊन आलोय. सुरुवात मोबाईल फोन सेटीन्ग्स ( mobile phone’s settings ) या पासून करूयात.

आपण आपला फोन चालू केला की सेटिंग या चिन्हावर जायचे ते चालू झाले की त्यात कितीतरी फिचर्स असतात. त्यापैकी आज आपण पहिल्या ५ फिचर्स (features) विषयी बोलणार आहोत.
• कनेकशन्स (Connections )
• साऊंड आणि व्हायब्रेशन (Sound & vibration)
• डिस्प्ले (Display)
• वॉलपेपर आणि थिम्स (Wallpaper & themes)
• नोटिफिकेशन (Notification)

कनेकशन्स (Connections ) :- ज्यात तुम्ही तुमचा फोन इतर फोन सोबत कनेक्ट करू शकता म्हणजे जोडू शकता.
यात तुम्हाला मोबाईल डाटा (mobile data) , wi-fi कनेकशन्स, ब्लूटूथ (Bluetooth) , wi-fi हॉट-स्पॉट , एअरप्लेन मोड असे सगळे फिचर्स दिसतील.

साऊंड आणि व्हायब्रेशन (Sound & vibration) :- यामध्ये तुमच्या मोबाईल च्या आवाजासंबंधित सेटिंग करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या मोबाईल चा आवाज कमी जास्त ठेवता येतो. फोन आला तर कुठली रिंग टोन पाहिजे ती ठेवता येते. आवाज नकोच असेल तर सायलेंट (silent) वर ठेवता येतो किंवा या पैकी दोन्ही नको असतील तर व्हायब्रेशन (vibration) वर करता येतो. म्हणजे आवाज पण होणार नाही आणि आपल्याला फोन पण आलेला कळतो.

डिस्प्ले (Display) :- या मध्ये बरेचशे फिचर्स असतात. तुम्हाला तुमचा फोन कसा दिसला पाहिजे याचे फिचर तुम्हाला डिस्प्ले मध्ये मिळतील. यात तुम्हाला तुमचा फोन ऑटो रोटेट (auto-rotate) करता येतो. मोबाईलची लाईट ( brightness ) कमी जास्त करता येतो. तुमच्या फोन वरती कुठले-कुठले फिचर्स दिसले पाहिजे याची सेटिंग तुम्ही करू शकता.

वॉलपेपर आणि थिम्स (Wallpaper & themes) :- या फिचर मध्ये तुम्ही तुमच्या फोनवर म्हणजे फोनच्या डिस्प्ले वर कुठलीही इमेज ठेऊ शकता. वॉलपेपर हा फक्त तुमच्या स्क्रीनलाच लागू होतो आणि थिम ही तुमच्या पूर्ण मोबाईल ला लागू होते म्हणजे तुमचे जे फोन चे ॲप चे चिन्ह बदलतात.

नोटिफिकेशन (Notification) :- नोटिफिकेशन म्हणजे एखाद्या ॲप्लिकेशनची माहिती किंवा मेसेज येणे किंवा आपल्याला मिसकॉल येणे असे. Notification द्वारे तुम्हाला हे सुचवले जाते की तुम्हाला एखाद्या ॲपचा मेसेज आला आहे. या फिचर्स मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये बदल देखील करता येतात, ,म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कुठले नोटिफिकेशन दिसले पाहिजे किंवा नाही हे त्या ॲपचे नोटिफिकेशन फिचर बंद करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *