आपल्याला लहानपणा पासून माहित आहे की जंगलाचा राजा सिंह आहे म्हणून. आपण ऍनिमेटेड (animated) चित्रपटांमधे किंवा कार्टून्स मध्ये बघतो जंगलाचा राजा नेहमी सिंह हाच दाखवतात. पण कधी डोक्यात विचार आलाय का, की सिंह हाच का असतो जंगलाचा राजा ? किंवा सिंह च का जंगलाचा राजा वाघोबा का नाही. सिंहाप्रमाणे वाघ देखील तितकाच शक्तिशाली आहे जितका सिंह आहे. पण तरी देखील सिंहालाच जंगलाचा राजा मानतात ? तर ही मान्यता फक्त आपल्या मानवापूर्तीच मर्यादित नसून जंगलातल्या इतर प्राण्यांनी देखील हे मान्य केले आहे.
सिंहाचे वजन साधारणतः १९० किलो च्या आसपास असते आणि वाघाचे वजन २२० किलो , २३० किलो इतके असते. सिंहाची गर्जना आपल्याला ८ किलोमिटर अंतरापर्यंत ऐकू येऊ शकते. सिंहा पेक्षा वाघाचा आकार जास्त असतो.
सिंह नेहमी सिंहीन आणि शावकांसोबतच (सिंहाची पिल्ले) राहतो. सिंहाला गटामध्ये (group) राहायला आवडते. एखाद्या राजाप्रमाने दुसऱ्या वन्य प्राण्यांपासून घुसखोरांपासून सिंह आपल्या गटाचे मरेपर्यंत संरक्षण करतो. याउलट वाघाला एकटे राहायला आवडते. तो सिंहाप्रमाने गटात कधीच राहत नाही. सिंहाला जेव्हा भूक लागते तेव्हाच तो कुठल्याही प्राण्याची शिकार करतो परंतु वाघ याच्या अगदी उलट म्हणजे तो भुकेलेला असताना तर शिकार करतोच पण कधी कधी स्वतःच्या आनंदासाठी ही तो एखाद्या प्राण्याची शिकार करतो. हा सर्वात मोठा फरक आहे सिंह आणि वाघ यांच्यातला.
सिंह पक्षी, ससा, कासव, उंदीर, सरडे, रानटी कुत्रे, काळवीट अशा छोट्या प्राण्यांच्या शिकारी बरोबर चित्ता, म्हैस, बिबट्या, मगरी, बाळ हत्ती, गेंडा, पाणघोडा आणि अगदी उंच जिराफ अशा मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करतात. तर वाघ प्रामुख्याने सांबर हरण, रानडुकरे, पाण्याची म्हैस आणि काळवीट खातात.
सिंह एखाद्या राजाप्रणाने आपल्या गटात राहतो. तो कधीतरी शिकार करायला जातो. गटातल्या सिंहीनी जास्त करून शिकारीला जातात. तर वाघाला स्वतःच जावे लागते शिकार करायला. शास्त्रज्ञांच्या मते वाघ हा सिंहापेक्षा जास्त हुशार आणि अधिक भयंकर आहे. पण तरीदेखील सिंहामध्ये एखाद्या राजासारखेच गुण आढळून येतात. त्यामुळे सिंहालाच जंगलाचा राजा म्हणतात वाघाला नाही.