तुम्ही आमिर खान चा “3 idiots” पहिला असेलच. त्यातला तो सीन पण आठवतो का जेव्हा विरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस पहिल्यांदा सगळ्यांना अभिवादन (introduce) करत असतो आणि त्याची पेन बद्दलची “interesting story“ सांगतो. त्याच्याकडे असलेले अंतराळवीर (astronaut) पेन हे अंतराळात (in space) लिहिण्यासाठी वापरले जाते मग अमीर खान प्रश्न करतो, अंतराळवीर (Astronaut) नी पेन्सिल का नाही वापरली? आमिरच्या या प्रश्नावर सगळे जण हसतात, ते लोक काय तर हा चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्गही हसलाच असेल. पण आमिर ने विचारलेला हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. की खरंच अंतराळवीर अंतराळात पेन वापरतात की पेन्सिल ? जर पेन वापरत असतील मग पेन्सिल का नाही ?
पेन्सिल तयार करण्यासाठी लाकूड आणि शिसे (lead) या दोन्ही गोष्टी लागतात. पेन्सिलितील शिसे म्हणजे lead ही ग्रेफाइट आणि चिकन माती या दोन घटकांपासून बनलेली असते. ग्रेफाइट हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. हे एक मोठे आणि महत्वाचे कारण आहे अंतराळात पेन्सिल न वापरण्याचे. शिवाय पेन्सिली ची टोक तुटून ती कोणाच्या डोळ्यात किंवा नाकात जाऊन इजा होऊ शकते. तसेच अंतराळयानातील यंत्रात जाऊन बिघाड होण्याचाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
अंतराळात गुरुत्वाकर्षण कमी असल्याने साधे पेन किंवा बॉल पॉइंट पेनाची शाई बाहेर येत नाही. मग अंतराळात लिहिण्यासाठी एक स्पेस पेन (Space Pen) बनवण्यात आले.
कोणी बनवला पहिला अंतराळात लिहू शकणारा स्पेस पेन?
हे स्पेस पेन बनवले होते फिशर पेन कंपनी चे संस्थापक पॉल सी फिशर यांनी. पॉल सी फिशर यांनी स्पेस पेन हे १९६५ साली १ दशलक्ष डॉलर्स इतक्या स्व खर्चातून विकसित केले. आणि मग ते नासा (NASA) च्या स्वाधीन केले. नासा नेही मग अंतराळात वापरण्यासाठी त्या पेनाच्या विविध चाचण्या केल्या आणि मग २ वर्षांनी अखेर स्पेस पेन ला मान्यता दिली. फिशर स्पेस पेन चा उपयोग १९६८ साली अपोलो ७ स्पेस मिशन (Apollo 7 Space Mission) मध्ये करण्यात आला.
स्पेस पेन हे Zero-Gravity Pen म्हणजेच शून्य गुरुत्वाकर्षण पेन म्हणून देखील ओळखले जाते. या पेनाचा बॉल पॉइंट हा टंगस्टन कार्बाईडपासून बनवला आहे आणि या पेनात गॅस आणि थिक्सऑट्रॉपिक नावाची शाई वापरलेली असते जी शून्य गुरुत्वाकर्षणात देखील लिहिते.
स्पेस पेन हे शून्य गुरुत्वाकर्षणात तर वापरू शकतोच शिवाय हे पेन पाण्याखाली किंवा तेलकट किंवा स्निग्ध पदार्थांवर लिहिण्यासाठी देखील वापरू शकतो. एवढेच नाही तर हे पेन उच्च तापमानाला देखील लिहू शकते.
ऍमेझॉन वर हे पेन कोणीही विकत घेऊ शकतो. जर तुम्हाला हि हे पेन विकत घ्यायचे असेल किंवा त्याच्या आधुनिक बदलांबद्दल अजून जाणून घायचा असेल तर इथे क्लिक करा.