निळ्या रक्ताचे जीव

निळ्या रक्ताचे जीव कोणते आणि आपल्या रक्ताचा रंग लालच का ?

निळ्या रक्ताचे जीव

“ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून… बता इसमेसे हिंदू का कौनसा ऑर मुसलमान का कौनसा?

आठवतोय का हा डायलॉग नाना पाटेकर यांचा “क्रांतिवीर” चित्रपटातला. या प्रसंगात नाना पाटेकर यांना हे सांगायचे असते की सगळ्यांच्या रक्ताचा रंग एकच असतो “लाल” मग ते रक्त कोणाचेही असो.

पृथ्वी तलावर जेवढे पण प्राणी, पक्षी आहेत, अगदी आपण माणूस देखील आपल्या सगळ्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे. मग ते आकाशात उडणारे जीव असो व पाण्यात पोहणारा जीव असो व आणखी कोणता जीव असतो सगळ्यांच्या रक्ताचा रंग लालच असतो. याला निसर्गाची नियमावली म्हणा नाहीतर अजून काही. रक्तगट भलेही वेगवेगळे असो अगदी निगेटिव्ह (Negative) सुद्धा पण रंग मात्र एकच लाल. पण तुम्ही कधी ऐकले आहे का कधी कुठल्या प्राण्याचा रंग निळा किंवा काळा आहे? नाही ना! पण निसर्गाच्या या नियमावलीला काही प्राणी अपवाद आहेत.

शरीरामध्ये रक्ताची गरज का असते ?

अपुऱ्या रक्तामुळे आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. रक्त हे आपल्या पूर्ण शरीरभर फिरते आणि फिरता फिरता संपूर्ण शरीराभोवती ऑक्सीजन पोहोचवण्याचे कामही करते. रक्तात असणाऱ्या पेशींमुळे आपण रोगाशी प्रतिकार करू शकतो. तसेच कार्बन डाय ऑक्साईड आणि शरीराला नको असलेले टाकाऊ पदार्थ रक्ताद्वारे फुफुस , किडनी आणि पाचन यंत्रणेत वाहून नेले जातात जेणे करून ते पदार्थ शरीर बाहेर टाकले जातील.

आपल्या रक्ताचा रंग लाल का ?

आपल्या रक्तात हिमोग्लोबिन नावाचा एक रेणू असतो. या हिमोग्लोबिन चा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. त्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असणे आवश्यक असते. रक्तातील हे हिमोग्लोबिन ऑक्सिजन ला बांधून ठेवते आणि पूर्ण शरीरभर वाहून नेते. हिमोग्लोबिन च्या एका रेणुमध्ये लोह म्हणजेच आयर्न (iron) चा एक अणू असतो. लोहाच्या याच अणुला ऑक्सिजन चिकटतो. हिमोग्लोबिन हे चार प्रथिन साखळ्यांनी बनलेली असते आणि या प्रत्येकामध्ये हेम्स (Haems) नावाची रासायनिक रचना असते. हे हेम्स लोहयुक्त असतात. रक्तामध्ये या हेम्स ची संख्या लाखोंनी असते. हिमोग्लोबिन मधील या हेम्स गटामुळे आपली रक्तपेशी लाल असते.

ऑक्सिजन युक्त हिमोग्लोबिन चा रेणू प्रकाशाचे सर्व रंग शोषून घेतो. परंतु लाल रंग परावर्तित करतो.

रक्ताचा रंग लाल या निसर्गाच्या नियमावलीला अपवादात्मक आणि निसर्गानेच निर्माण केलेले जीव म्हणजे “गोगलगाय (Snail)” , “कोळी (Spiders)”  आणि “ऑक्टोपस (Octopus)”. यांचे रक्त हे लाल रंगाचे नसून तर ते निळ्या रंगाचे असते.

लाल रंगाच्या रक्तात हिमोग्लोबिन असते. तर गोगलगाय, कोळी किंवा ऑक्टोपस यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नसते तर त्या ऐवजी हीमोसायनिन असते. हीमोसायनिन मध्ये हिमोग्लोबिन प्रमाणे लोह म्हणजे आयरन (iron) चा अणू नसून कॉपर म्हणजे तांब्याचा अणू असतो. हा तांब्याचा अणू ऑक्सिजन ला बांधतो आणि त्या जिवाच्या शरीरभर पोहोचवतो. हेमोसायानिन हे प्रकाशातील सगळे रंग शोषून घेतो निळा रंग सोडून त्यामुळे रक्ताचा रंग निळा असतो. ऑक्सिजन युक्त हमोसायानिन हे निळ्या रंगाचे दिसते आणि ऑक्सिजन नसलेले हेमोसायनीन चा रेणू हा रंगहीन आढळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *