‘चपट्या पिनचा चार्जर आहे का ?‘ किंवा ‘बारीक पिनचा चार्जर आहे का ?’ अशी वाक्य आपण किती तरी वेळा ऐकतो किंवा आपणच कधी कधी बोलतो. मोबाईल फोन हा खरंच आजकाल काळाची गरज बनला आहे. मोबाईल शिवाय आपली सकाळ होत नाही की दिवस संपत नाही. पण कधी कधी जसे आपण थकतो तसे मोबाइललाही आरामाची गरज भासते. त्याची ही बॅटरी संपते. मग आठवण येते मोबाईल च्या चार्जरची. आपल्याकडे आपला असला तर बरा नाहीतर ही अशी वरची वाक्य बोलत फिरावे लागते चार्जर मिळे पर्यंत.
पण हा चपट्या पिनचा, बारीक पिनचा किंवा जाड्या पिनचा चार्जर यांना नक्की म्हणतात तरी काय ?
पूर्वी जेवढे मोबाईल फोन वेगवेगळे तेवढे त्यांचे चार्जर वेगवेगळे. त्यामुळे घरात ३ ते ४ वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर असायचेच. पण बदलत्या काळानुसार जशी मोबाईल फोन मध्ये प्रगती झाली तशी त्यांच्या चार्जर मध्येही झाली. आता बहुत करून सगळ्यांचे चार्जर म्हणजे मोबाईल चार्जर ची चार्ज करण्याची पिन एकसारखी असते.
नक्की चार्जर चे किती प्रकार असतात ?
आता जे मोबाईल फोन चे चार्जर असतात ते ६ ते ७ प्रकारांमध्ये आढळून येतात.
१. टाईप A (Type A) – या प्रकारचा चार्जर हा सपाट आणि आयाताकृती आकाराचा असतो. टाईप A हा सर्वात पहिला आणि मूळ USB कनेक्टर आहे. पूर्वी या प्रकारचे चार्जर जास्त असायचे. परंतु आता टाईप A चे चार्जर फक्त डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी किंवा कनेक्ट करण्यासाठी केला जातो. हल्लीच्या मोबाईल च्या चार्जर च्या अडाप्टर ला एका बाजूला टाईप A चा चार्जर असतो. या प्रकारचे पिन किंवा चार्जर फक्त संगणक, लॅपटॉप किंवा वैयक्तिक तंत्रज्ञान म्हणजे पेनड्राईव वैगरे या पुरताच वापर केला जातो.
२. टाईप B (Type B) – हा चार्जर चौरस आकाराचा असून वरच्या दोन बाजूंना उतार असतो. या प्रकारचे चार्जर किंवा पिन ही फक्त प्रिंटर किंवा स्कॅनर यासाठीच वापरतात.
३. टाईप C (Type c) – टाईप C हा चार्जर मधला नवीन प्रकारचा चार्जर आहे. या प्रकारचा चार्जर हा टाईप A आणि टाईप B यावरील सर्वोत्तम पर्याय आहे. या कनेक्टर्सचा मुख्य फायदा म्हणजे उलट करता येणारा पर्याय आहे. तुम्ही कनेक्टरला पोर्टमध्ये चांगल्या प्रकारे फिट करण्यासाठी कोणत्याही दिशेने प्लग करू शकता. या प्रकारच्या चार्जर ने चार्जिंग अधिक वेगवान होते. एवढेच नाही तर डाटा ट्रान्स्फर किंवा USB कनेक्टिव्हिटी अधिक जलद गतीने होते. आजकाल मोबाईल फोन्स ना टाईप C चे चार्जर असतात.
४. Mini USB – या प्रकारचे चार्जर हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक्स जगातून अधिकृत पणे गायब झाले आहेत. म्हणजेच Mini USB चा वापर मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉप या कशातच केला जात नाही. या प्रकारच्या चार्जर चा वापर बहुतकरून डिजिटल कॅमेरा मध्ये केला जातो.
५. Micro USB – Micro USB चार्जर हे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या चार्जर पैकी एक आहे. Micro USB हे Mini USB पेक्षा आकाराने लहान असते. या प्रकारच्या चार्जर ने देखील डाटा ट्रान्स्फर आणि चार्जिंग जलद गतीने होते.
६. लाईटनिंग चार्जर – लाईटनिंग केबल चार्जर हा एक असा चार्जर आहे जो फक्त Apple वापरकर्त्यांसाठी च आहे जो फक्त Apple च्या उपकरणांना च चालू शकते जसे की IPhone ५, iPad Air. लाइटनिंग पोर्ट्स हे Apple, Inc चे मालकीचे पेटंट केलेले डिझाइन आहेत.