कोण आहेत नंबी नारायणन (Nambi Narayanan)

नंबी नारायणन
नंबी नारायणन

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट ( Rocketry : The Nambi Effect ) नाव तर ऐकलेच असेल या चित्रपटाचे. मॅडी चा नवीन चित्रपट नुकताच रिलीज झाला १ जुलै ला. या चित्रपटाची गोष्ट स्वतः मॅडीने लिहिली आहे आणि चित्रपट देखील त्याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची गोष्ट ही नंबी नारायणन यांच्या जीवनशैली वर आधारित आहे. या चित्रपटात मॅडी ने नंबी नारायणन यांचे व्यक्तिचित्र साकारले आहे.

रोकेट्री: द नंबी इफेक्ट

कोण आहेत नंबी नारायणन (Nambi Narayanan) ?

नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यामध्ये माजी वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते. २०१९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म भूषण देऊन सन्मानित केले. नंबी नारायणन यांचा जन्म १२ डिसेंबर १९४१ रोजी नागरकोविल येथे झाला. हे नागरकोविल म्हणजे पूर्वीच्या संस्थानातील त्रावणकोर म्हणजे आताचा कन्याकुमारी जिल्हा होय.

नंबी यांनी भारताच्या पहिल्या PSLV मध्ये वापरल्या गेलेल्या विकास इंजिन साठी फ्रेंच कडून तंत्रज्ञान घेतलेल्या संघाचे नेतृत्व त्यांनी केले. एवढेच नव्हे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक्स विभागाचे इन्चार्ज होते. १९६९ मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मधून प्रोफेसर लुइगी क्रोको (Luigi Crocco) यांच्या अंतर्गत रासायनिक रॉकेट प्रोपल्शनमध्ये त्यांनी मास्टरी पूर्ण केली. ज्या वेळी भारतीय रॉकेट पूर्णपणे सॉलिड प्रोपेलेंट्सवर अवलंबून होते त्यावेळी नंबी यांनी लिक्विड प्रोपल्शन (liquid propulsion ) मध्ये निपुणता मिळवली होती.

नंबी नारायण यांना झाली होती जेल

मरियम रशीदा आणि फौजिया हसन या मालदीव मधील दोन संशयीत महिलांना नारायणन यांनी रॉकेट ची रेखाचित्रे आणि कागदपत्रे दिली आणि त्याबदल्यात त्यांना काही रक्कम मिळाली. याबाबत तपासासाठी केरळ पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो अधिकार्‍यांच्या पथकाने नंबी यांना हेरगिरीचा ठपका ठेवून ३० नोव्हेंबर १९९४ रोजी अटक केले. या दोन महिला पाकिस्तानला संरक्षण माहिती देण्याचे काम करत असत आणि त्याबदल्यात मालदीव बँकर कडून त्यांना निधी मिळत असा संशय होता. नारायणन यांना अटक केल्यानंतर ५० दिवस जेल मध्ये काढावे लागले होते.तिथे त्यांना खूप टोरच्टर केले गेले. त्यांच्यावरची हेरगिरीची ही केस पुढील चार वर्ष चालू राहिली. शेवटी सत्याचा विजय होतो तसाच १९९८ साली “सीबीआयला असे आढळून आले की एकही खटला निकाली काढला नाही” असे सांगून सुप्रीम कोर्टाने नंबी यांची निर्दोष मुक्तता केली.

या सगळ्यावर च आधारित आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या लोकांना माहीत देखील नाही त्याही या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट चित्रपटात दाखवल्या आहेत ज्या नंबी नारायणन यांच्यासोबत त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *