पूर्वी आपल्यातले गुण किंवा आपली कलाकारी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप कष्ट करावे लागत. प्रत्येकाला प्रत्येक वेळी आपली कलाकारी दाखवणे खूप अवघड जायचे. पण आता ते सगळं त्यामानाने खूप कमी कष्टाचे झाले आहे. आपली कलाकारी आपले गुण हे घराघरात पोहोचवणे सोपे झाले आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून. यू ट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक असे खूप सारे सोशल मिडियाचे पर्याय आता लोकांना खुले झाले आहे. अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं आपली कलाकारी लोकांना सादर करतात. आपले ‘ कच्च्या बदाम ‘ चेच उदाहरण घ्या ना. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला लोकांपर्यंत आपली कला सादर करता येते. आतचेच बघा ना ‘ हर हर शंभू ‘ ऐकलेच असेल हे गाणे. सध्या सगळीकडे याच गाण्याची चर्चा आहे. जिकडे तिकडे ‘ हर हर शंभू ‘ हेच ऐकायला येतंय.
हर हर शंभू (शंभू), शिव महादेवा शंभू (शंभू)
शिव महादेवा शंभू (शंभू),
हर हर शंभू (शंभू ), शिव महादेवा शंभू (शंभू)
‘ हर हर शंभू ‘ हे गाणे कोणी गायले आहे
हे गाणे लोकांना इतके आवडले आहे की कितीतरी लोकांनी या गाण्याची रिंगटोन ठेवली आहे. हे गाणे गायले आहे अभिलिप्सा पांडा आणि जीतू शर्मा या दोघांनी. आणि गाणे कंपोस्ड केले आहे आकाश देव यांनी. हे गाणे रिलीज झाले ५ मे ला. सुरुवातीच्या वेळी या गाण्याला एवढे व्ह्यूज नव्हते. पण जस जसे या गाण्याची प्रचिती लोकांना होत गेली तस तसे या गाण्याला लोकांनी पसंती दर्शवली. आता पर्यंत या गाण्याला जवळ जवळ २० दशलक्ष (million) इतके व्ह्यूज मिळाले आहेत.
हर हर शंभू (शंभू), शिव महादेवा शंभू (शंभू)
शिव महादेवा शंभू (शंभू)
हर हर शंभू (शंभू ), शिव महादेवा शंभू (शंभू)
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि ।।
असे या गाण्याचे बोल आहेत. जे ऐकायलाही खूप प्रसन्न आणि शांत वाटते. कर्पुरगौरं…. ही शंकराची आरती आपल्याला नवीन नाही परंतु हर हर शंभू हे गाणे ज्याप्रकारे गायले आहे त्याने आपण दोन पावले अजून या गाण्याच्या जवळ गेलो आहोत असे वाटते.