तुम्हाला माहितीये का “Hat-trick” हा शब्द आला कुठून ?

Hat-trick

“Hat-trick झाली त्याची! “ मॅच बघताना आपण असे कितीवेळा बोलून जातो. एखाद्या बॉलर ने सलग तीन वेळा विकेट घेतली किंवा बॅटमॅन ने सलग तीन वेळा सिक्स मारली की आपल्या तोंडून आपसूकच निघून जाते… काय hat trick मारली त्याने…!

पण तुम्हाला माहितीये का “Hat-trick” हा शब्द आला कुठून ?

तर “Hat-trick” या शब्दाचा उपयोग पहिल्यांदा १८५८ मध्ये केला गेला. आणि या शब्दाची सुरूवात ही क्रिकेट खेळामुळेच झाली. आणि आपल्या भारत देशात या खेळाचे लोकं किती चाहते आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही. तर हा शब्द वापरात येण्यामागचा इतिहास असा की, एच.एच. स्टीफनसन जे एक प्रसिद्ध इंग्लिश क्रिकेटपटू होते. त्यांनी १८५८ साली हॅलममध्ये बावीस विरुद्ध ऑल- इंग्लंड इलेव्हन या शेफील्डच्या हाइड पार्क मैदानावर झालेल्या सामन्यात एच.एच.स्टीफनसन यांनी सलग तीन चेंडूत तीन विकेट घेतल्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या चाहत्यांनी एच.एच.स्टीफनसन साठी संग्रह आयोजित केला. आणि त्या संग्रहाद्वारे मिळालेल्या पैशांनी चाहत्यांनी एच.एच. स्टीफनसन यांना एक Hat म्हणजे टोपी देऊन आपले प्रेम व्यक्त केले.

तेव्हापासून “Hat-trick” हा शब्द उदयाला आला. केवळ क्रिकेट मध्येच नाही तर इतर खेळांमध्येही तीन वेळा लागोपाठ यश मिळाल्यावर Hat-trick मारली असे संबोधले जाते.

ही १८५८ सालची गोष्ट आणि तसाच काहीसा प्रकार २०२१ चा म्हणजे आपली टीम इंडियाची बिलियन चीयर्स जर्सी जी बनवली होती क्रिकटप्रेमींच्या स्मरणार्थ. याचाच अर्थ असा की क्रिकेट चे वेड आताही तेवढेच आहे जेवढे तेव्हा होते.

एच.एच.स्टीफनसन

एच.एच. स्टीफनसन हे पहिले क्रिकेट पटू होते ज्यांना त्यांच्या सलग तीन चेंडूत तीन विकेट घेतल्याबद्दल Hat म्हणजे टोपी देण्यात आली आणि ज्यांच्यामुळे Hat-trick या शब्दाचा जन्म झाला. एच.एच. स्टीफनसन हे १८५३ ते १८७१ मध्ये सामने खेळले. या दरम्यान त्यांनी २५६ सामने खेळले आणि ३०३ विकेट घेतल्या. त्यांनी ११९ अश्या सर्वोच्च स्कोअर सह एकूण ७३६० अश्या धावा केल्या, ३ शतकेही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *