KissFlow कंपनीच्या मालकाने एम्प्लॉइजना दिली BMW कार गिफ्ट

KissFlow सीईओ सुरेश संबंदम
KissFlow सीईओ सुरेश संबंदम

आपण खूप वेळा ऐकतो की अमुक अमुक ला त्याच्या बॉस कडून अमुक अमुक गिफ्ट मिळाले किंवा त्याच्या कामावर खुश होऊन कंपनी ने त्याला काहीतरी बक्षीस दिले. हे आपण खूपदा ऐकले असेल किंवा स्वतः अनुभवले असेल. आतापर्यंत या गिफ्ट ला किंवा बक्षिसाला एक मर्यादा होती म्हणजे पहिले हे गिफ्ट किंवा बक्षीस काही हजारो किंवा कधी कधी लाखों रुपयांपर्यंत ची असायची. पण आताचे बॉस किंवा कंपनी चे मालक खूप दिलदार झाले आहेत. बॉस लोक हे आपल्या कंपनीत काम करणाऱ्यांची खूप जास्त काळजी घेतात. आपल्या एम्प्लॉइज ने आपल्या कंपनी साठी केलेली धडपड, त्यांची मेहनत, प्रामाणिकपणा हे सगळ तो बॉस पाहत असतो. आणि याच मेहनतीचे फळ म्हणून बॉस आपल्या एम्प्लॉइज ला बक्षीस पात्र समजतो.

Kissflow कंपनीच्या मालकाने दिली BMW कार गिफ्ट

अशाच एका बॉस ने आपल्या एम्प्लॉइज वर खुश होऊन त्यांना चक्क BMW कार गिफ्ट केली आहे. आणि अशा एक नाही दोन नाही तर पाच एम्प्लॉइज ना प्रत्येकी एक अशी BMW गाडी गिफ्ट केली आहे. हो हे खरे आहे. आम्ही बोलत आहोत चेन्नई स्थित असलेल्या “Kissflow” या IT software कंपनीची. “ Kissflow “ या कंपनीचे सीईओ सुरेश संबंदम यांनी आपल्या पाच एम्प्लॉइज ना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कंपनी साठी असलेली त्यांची वचनबद्धता (commitment) यासाठी प्रत्येकी एक अशी पाच BMW कार गिफ्ट केली आहे. या एका BMW गाडीची किंमत १ करोड इतकी आहे.

या बक्षीस पात्र असलेल्या एम्प्लॉइज ना हे माहीत देखील नव्हते की ते बक्षीस पात्र आहेत आणि त्यांना एक कार गिफ्ट मिळणार आहे. हे सगळे गुपित ठेवण्यात आले होते आणि ८ एप्रिल ला बक्षीस देण्याच्या कार्यक्रम च्या काही वेळे आधी त्यांना हे ‘ surprise gift ‘ सांगण्यात आले.

सीईओ सुरेश संबंडम यांच्या म्हणण्यानूसार हे पाच जण Kissflow Inc. च्या सुरुवातीपासून म्हणजे २००३ ला Kissflow Inc. ची स्थापना झाली तेव्हापासून ते कंपनीसोबत काम करत आहेत. कोविड-१९ च्या महामारीच्या काळात देखील जिथे गुंतवणुक दारांना शंका होती की ही कंपनी चालेल की नाही अशा परिस्थीतही त्यांनी कंपनीची साथ सोडली नाही.

कोण आहेत सुरेश संबंदम ?

सुरेश संबंदम
सुरेश संबंदम

सुरेश संबंदम हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. त्यांचा जन्म १९७४ साली तामिळनाडू मधील पोंडेचेरीतील कुड्डूलोर येथे झाला. OrangeScape Software आणि Kissflow Inc. चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून ते प्रसिध्द आहेत. वयाच्या १९ व्या वर्षापासून त्यांनी उद्योजकता करण्यास सुरुवात केली. १९९७ ला सुरेश यांनी HP Inc. कंपनीत सॉफ्टवेअर परीक्षक म्हणून व्यवसाय सुरू केला. तिथे त्यांनी वोडाफोन साठी मोबाईल फोन नेटवर्क मधील फसवणूक ओळखण्यासाठी Talarian’s Constant Induction Motor ( RTIE ) चा वापर केला.

नंतर २००३ मध्ये त्यांनी OrangeScape ची स्थापना केली. सुरेश संबंदम हे वेगवगळ्या इंडस्ट्री चर्चा, स्कॉलस्टिक फाउंडेशन मध्ये इंटरप्राइज आणि व्यवसायाच्या विविध विषयांवर वक्ता म्हणून काम करतात आणि एवढेच नव्हे तर ते आशियातील सर्वात मोठ्या SaaS परिषद आणि SaaSBoomi च्या आयोजकांपैकी एक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *