मोबाईल फोन सेटिंग्ज, त्याच्या चार्जर चे प्रकार हे आपण पाहिले. फोन चार्ज करण्यासाठी आपण चार्जर ची USB ची वायर (cord) आपण मोबाईल च्या अडप्टर ला जोडतो आणि दुसरी बाजू मोबाईल ला जोडतो आणि फोन चार्ज होयला सुरुवात होते. तसेच एखादा डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी आपण वायर ची एक बाजू मोबाईल ला आणि दुसरी USB टाईप ची बाजू संगणक किंवा लॅपटॉप यांना जोडतो आणि डाटा ट्रान्स्फर करतो. यामध्ये जी USB प्रकारची वायर आपण बघतो त्याला म्हणतात OTG ( On-the-go).
OTG म्हणजे काय ?
OTG हे यूएसबी डिव्हाइसेसना, जसे की टॅब्लेट किंवा स्मार्टफोन इत्यादींना स्वतः होस्ट म्हणून कार्य करण्यास अनुमती देते. उदाहरणार्थ आपले पेनड्राईव मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे. मग OTG च्या एका बाजूला पेनड्राईव आणि दुसरी बाजू मोबाईल ला जोडून तुम्ही पेनड्राईव मोबाईल ला कनेक्ट करू शकता. यासाठी फक्त आपल्याला फोन मधले OTG हे ऑप्शन चालू करावे लागते.
मोबाईल फोन मध्ये OTG ऑप्शन कसे चालू करायचे ?
OTG हे ऑप्शन आताच्या स्मार्टफोन्स मध्ये सहज उपलब्ध असतेच असते. तर हे ऑप्शन असते कुठे आणि ते कसे चालू करायचे? तर हे ऑप्शन असते मोबाईल च्या सेटिंग्ज (settings) मध्ये. OTG connection म्हणून ऑप्शन असते. ते चालू केले की तुमचा फोन तुमच्या पेनड्राईव ला कनेक्ट होतो. त्याद्वारे तुम्ही तुमची फाईल किंवा फोटो किंवा अजून काही ट्रान्स्फर किंवा बघू शकता. म्हणजे पेनड्राईव मधून डाटा घेण्यासाठी संगणक किंवा लॅपटॉप ची आवश्यकता नाही, तर डायरेक्ट पेनड्राईव मधून डाटा मोबाईल मध्ये घेता येतो.
OTG हे युनिव्हर्सल सीरियल बस (USB) आहे. युनिव्हर्सल सीरियल बस (USB) म्हणजे जे केबल्स, कनेक्टर आणि प्रोटोकॉलसाठी कनेक्शन, कम्युनिकेशन आणि पॉवर सप्लाय (इंटरफेसिंग) साठी कॉम्प्युटर, पेरिफेरल्स आणि इतर कॉम्प्युटर यांच्यातील तपशील स्थापित करते.
USB चा शोध कोणी लावला ?
इंटेलचे (Intel) मुख्य प्रणाली तंत्रज्ञ अजय भट्ट यांनी USB तंत्रज्ञान तयार केले. या USB टेक्नोलॉजी ला तंत्रज्ञानाला दोन दशकांपासुन आतापर्यंत बरीच वर्ष गेली आणि अजूनही हे तंत्रज्ञान संपूर्ण जगभरातील उपकरणांना वापरले जात आहे.