pop it

Pop it हे खेळणे कसे प्रसिध्द झाले ?

Pop it खेळणे
Pop it खेळणे

गोट्या, लगोरी, विटी दांडू, भातुकली, लुडो, कॅरम….वैगरे वैगरे. किती नाव सांगायची खेळांची. पूर्वी मैदानी खेळ खूप असायचे. आणि मुले खेळायची देखील. मैदानी खेळ च काय तर साधा काचांचा खेळ पण ३-४ जण मिळून खेळायचे. आता काळ बदलला त्याप्रमाणे खेळांचे प्रकारही बदलले. आता मैदानी खेळ म्हटले की फक्त क्रिकेट किंवा फुटबॉल च खेळताना दिसतात. आताच्या खेळांनी तर मैदानच सोडले. दहा बारा जणांचा ग्रुप आता दोघा तिघांवर आला. घरीच बसून खेळ “ग्रुप ने” खेळला जाऊ लागला. म्हणजे व्हिडिओ गेम्स ओ !

पण ही आताची खेळणी एवढ्यावरच न थांबता आता एकटे पाडायला लागली आहेत. त्यातच एक भर म्हणजे ‘pop it ‘ हा खेळ.

डोळ्यासमोर आले का काही ‘Pop it’ म्हटल्यावर. रंगीबेरंगी, नरम, छोटे छोटे बुडबुड्यासारखे फुगे ( bubbles ) असलेले जे दाबले की pop असा आवाज येतो. आणि ते दोन्ही बाजूने खेळले जाऊ शकते. हा हे एक फीजेत टोय ( fidget toy ) आहे जे कंटाळवाणेपणा आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करते.

Pop it चा शोध कोणी लावला ?

भलेही हे खेळणे आता जास्त प्रसिध्द झाले असले तरी याचा शोध आताचा नाहीये. या खेळण्याचा शोध मुळतः १९७५ साली झाला. या खेळण्याचा शोध थिओ आणि ओरा कोस्टर या इस्रायली जोडप्याने लावला. सुरुवातीला असे खेळणे बनवायला कोणीही तयार झाले नाही कारण हे खेळणे बनवायला मोठ्याप्रमाणात रबर लागणार होता आणि ते खूप महागात पडणारे होते. पण २०१९ मध्ये FoxMind ने Buffalo Toys सोबत सिलिकॉनचा वापर करूूून याखेळण्याची निर्मिती केली आणि या खेळण्या ला “Pop It” असे नाव दिले.

Pop it हे खेळणे कोणी प्रसिध्द केले ?

एखाद्या प्राण्यामुळे कोणता खेळ प्रसिध्द होऊ शकतो का ? तर हो pop it हा खेळ एका गेटलिन नावाच्या माकडामुळे प्रसिध्द झाला. २०२० मध्ये गेटलिन चा एक tiktok व्हिडिओ खूप प्रसिध्द झाला होता. त्यात तो हा खेळताना दिसतो. तेव्हा पासून या खेळण्याला मागणी मिळाली. Tik tok व्हिडिओ मुळे कितीतरी जण प्रसिध्दी च्या झोतात आले जसे की कच्चा बदाम फेम भुबन बद्यकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *