पूर्वीच्या काळात कोणाला संदेश पाठवायचा असेल तर आपण पत्र लिहायचो पण आता तसे नाहीये. जसजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसे त्याने नवनवीन गोष्टींचा शोध लावला. मग पत्राचे रूपांतर मेल्स (mails), मेसेज (message) यांत झाले. पूर्वी आपण हाताने पत्र लिहायचो पण आता कम्प्युटर (computer) , लॅपटॉप (laptop) किंवा मोबाईल (mobile) च्या कीबोर्ड (keyboard) वर टाईप करुन पाठवतो. पण कधी विचार करता का की हे कम्प्युटर (computer) , लॅपटॉप (laptop) किंवा मोबाईल (mobile) चे कीबोर्ड (keyboard) अल्फाबेटिकल (alphabetical) प्रमाणे म्हणजेच A, B, C, D …. या प्रमाणे का नाहीयेत.
तर याचे उत्तर खुप वर्षांपूर्वीच्या टाईप राईटर (type-writer) किंवा टंकलेखन यामध्ये दडलेले आहे. जेव्हा पहिल्यांदा टाईप राईटर् चा शोध लागला तेव्हा त्याचे कीबोर्ड हे अल्फाबेटिकल प्रमाणेच मांडलेले होते. म्हणजेच A, B, C, D,… याप्रमाणे. आणि जसजसे हे टाईप राईटर वापरत येऊ लागले तसतसे लोकांचा त्यावर टाईप करण्याचा वेग वाढू लागला. पण त्यामुळे जे जोड शब्द होते जसे की “th” किंवा “st” ते वेगाने टाईप करताना टाईप राईटर अडकत होते त्यामुळे कीबोर्ड जाम होयचा.
हे टाळण्यासाठी पहिल्या Qwerty कीबोर्ड ची निर्मिती झाली. पहिल्या Qwerty कीबोर्ड ची निर्मिती १८७० साली क्रिस्टोफर शॉल्स (Christopher Sholes) यांनी केली. क्रिस्टोफर शॉल्स हे पहिल्या मॉडर्न (modern) टाईप रायटर चे निर्माते होते.
आजकाल आपण जे कम्प्युटर (computer) , लॅपटॉप (laptop) किंवा मोबाईल (mobile) वर जे कीबोर्ड वापरतो ते Qwerty पद्धतीचे कीबोर्ड आहेत. Qwerty कीबोर्ड चे Qwerty हे नाव नाव नसुन कीबोर्ड वरील डाव्या बाजूच्या पहिल्या ओळीतील पहिली सहा अक्षर आहेत.
Qwerty keyboard हे कम्प्युटर (computer) , लॅपटॉप (laptop) किंवा आताचे टच स्क्रीन वाले स्मार्ट फोन यामध्ये वापरतात. परंतु जेव्हा आतासारखे टच स्क्रीन वाले फोन नव्हते आपले साधे मोबाइल फोन होते पण तेव्हा देखील आपण त्यात टाईप करण्यासाठी कीबोर्ड चा वापर करायचो त्या कीबोर्ड ला Half-Qwerty keypad म्हणतात. म्हणजे एकच बटण दोन अक्षर टाईप करायला वापरणे.
१९३६ साली ऑगस्ट डीव्होरॅक आणि त्याचा मेहुणा विल्यम डिले यांनी Qwerty कीबोर्ड प्रमाणेच Dvorak कीबोर्ड पद्धती लोकांसमोर मांडले परंतु ते यात अयशस्वी ठरले.