क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी ही एक व्यवहाराची नवीन पद्धत किंवा प्रकार आहे. क्रिप्टोकरन्सी हे संगणकाच्या साहाय्याने बनवलेले चलन आहे. ही करन्सी कुठेही छापील स्वरूपात नसते म्हणून हिला आभासी चलन असेही म्हणतात. ही करन्सी किंवा चलन तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच खरेदी किंवा विक्री करू शकतात. क्रिप्टोकरन्सी ही एक अशी डिजिटल मालमत्ता किंवा संपत्ती असते जिच्यावर कोणत्याही बँकेचा किंवा आर्थिक संस्थेचे कोणतेही नियंत्रण नसते. यात तुम्ही १ रुपया पासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. क्रिप्टोकरन्सी मधील नफा तोटा हा त्याच्या मागणीवर अवलंबून असतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्या आधी त्याची मागणी किती आहे, त्याची किंमत, त्याचा महिन्याभरात किती उतार चढाव झालंय या सगळ्याचा अभ्यास करून मगच यात गुंतवणूक करावी.Read More →